करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पण करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही आहे. भारतातील IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“अखेर ‘तो’ अधिकृतरित्या मूर्खांच्या यादीत सामील झाला”

क्रिकेटपटू आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी लाईव्ह चॅटचा आधार घेत आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत. काही लोक स्वत:चे लहानपणीचे फोटो पोस्ट करत आहेत. तर, काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. भारताचा फिरकीपटू चहलदेखील टिकटॉक व्हिडीओ करताना दिसत आहे. मात्र त्याच्या व्हिडीओजवरून त्याला ट्रोल केलं जात आहे.

दुर्दैवी! करोनामुळे मूळ भारतीय असलेल्या ज्येष्ठ क्रीडापटूचे निधन

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स यांनी लाईव्ह चॅटमार्फत एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधला. यात बोलताबोलता विराटने डीव्हिलियर्सने चहलच्या टीकटॉक व्हिडीओजची खिल्ली उडवली. तर नुकतेच एका लाईव्ह चॅटमध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेल याने चहलची खिल्ली उडवली. “मी टिक टॉकला सांगणार आहे की तुला ब्लॉक करून टाक. कारण तू सोशल मीडियावर खूप तापदायक ठरतो आहेस. तू लवकरात लवकर सोशल मीडियावरून निघून जा. आम्ही सगळे चहलला कंटाळलो आहोत. मला तुला अजिबात परत बघायचं नाहीये. मी तुला ब्लॉकच करतो”, असं अत्यंत मजेशीरपणे गेल म्हणाला.

“Ouch”… इशा गुहाने केलं माजी क्रिकेटपटूला ट्रोल

याबाबत स्टार स्पोर्ट्सशी बोलताना चहलने झकास उत्तर दिलं. तो म्हणाला की ख्रिस गेलला हे माहिती नव्हते की मी देखील टीकटॉकवर आहे. त्याला जेव्हा समजलं, तेव्हा त्याच्याला स्पर्धक येऊ नये म्हणून त्याने मला ब्लॉक करण्याची मागणी मजेदार पद्धतीने केली.