एकमेव  
एकाच सामन्यात द्विशतक, दोन बळी आणि एक झेल अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पहिला खेळाडू.  कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू.

२१५
विश्वचषकातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या. त्याने गॅरी कर्स्टनचा संयुक्त अरब अमिरातीविरुद्धचा १८८ धावांचा रावळपिंडी येथील १९९६मधील विक्रम मोडला.


एकदिवसीय क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या. रोहित शर्मा (२६४) पहिल्या तर वीरेंद्र सेहवाग (२१९) दुसऱ्या स्थानी.

१६
एकदिवसीय प्रकारात वैयक्तिक डावात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम संयुक्तपणे नावावर. आता हा विक्रम रोहित शर्मा, ए बी डी’व्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांच्या नावावर.

२४ फेब्रुवारी :
 पाच वर्षांपूर्वी याच दिवशी ग्वाल्हेरमध्ये सचिन तेंडुलकरने एकदिवसीय प्रकारातील पहिलेवहिले द्विशतक झळकावले होते. पाच वर्षांनंतर ख्रिस गेलने एकदिवसीय प्रकारातील पाचव्या द्विशतकाची नोंद केली.

२२
एकदिवसीय प्रकारातील गेलची शतकांची संख्या. वेस्ट इंडिजतर्फे एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक शतकांचा विक्रम आता गेलच्या नावावर. एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि सौरव गांगुलीसह चौथ्या स्थानी.

९,१३६
द्विशतकी खेळीनंतर गेलच्या नावावर असलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील धावा. नऊ हजारांचा टप्पा गाठणारा वेस्ट इंडिजचा केवळ दुसरा फलंदाज. याआधी ब्रायन लाराने हा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय प्रकारात हा टप्पा गाठणारा १६वा फलंदाज.

५९
गेलने द्विशतकी खेळीदरम्यान निर्धाव खेळून काढलेल्या चेंडूंची संख्या. एकूण खेळलेल्या चेंडूंपैकी ४०% चेंडू निर्धाव.

३७२
एकदिवसीय प्रकारात वेस्ट इंडिजची सर्वोच्च धावसंख्या. विश्वचषकातली पाचवी सर्वोच्च धावसंख्या. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील एकदिवसीय प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या.

४००
एकदिवसीय प्रकारातील गेलच्या षटकारांची संख्या. एकदिवसीयमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी. या यादीत पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पहिल्या क्रमांकावर.


एकदिवसीय क्रिकेटमध्ये
द्विशतक झळकावणारा खेळाडू. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग या द्विशतकवीरांच्या मांदियाळीत आता बिगरभारतीय ख्रिस गेल.

१३८
द्विशतकासाठी गेलने घेतलेल्या चेंडूंची संख्या. एकदिवसीय क्रिकेटमधील सगळ्यात वेगवान द्विशतक. त्याने वीरेंद्र सेहवागचा १४० चेंडूंतील द्विशतकाचा विक्रम मोडला.

३७२
ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी. एकदिवसीय प्रकारातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च धावसंख्येची भागीदारी. या दोघांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचा न्यूझीलंडविरुद्धचा ३३१ धावसंख्येच्या भागीदारीचा विक्रम मोडला. ही विश्वचषकातीलही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी.

२०
या खेळीपूर्वी गेलच्या एकदिवसीय प्रकारातील शतकाविना डावांची संख्या. गेलने शेवटचे शतक २०१३मध्ये श्रीलंकेविरुद्ध झळकावले होते.

पहिल्या चेंडूवर बाद व्हावे, हे मला कधीही वाटणार नाही. धावा करताना माझ्यावर दडपण होते. यापूर्वी माझ्यावर असे दडपण आले नव्हते. पण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र चांगली फलंदाजी होईल, हे मला माहिती होते. द्विशतक झळकावल्यावर पायांचे स्नायू दुखावले होते आणि मी दमलो होतो.
ख्रिस गेल, वेस्ट इंडिजचा फलंदाज