वेस्ट इंडिजला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत २-१ ने पराभव स्विकारावा लागला. अखेरच्या वन-डे सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजवर १८ धावांनी मात केली. मात्र पराभवानंतरही वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळून ख्रिस गेलने आतापर्यंत ४७६ षटकार खेचले आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर असलेल्या विक्रमाशी ख्रिस गेलने बरोबरी केली आहे. बांगलादेशने दिलेल्या ३०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने आक्रमक सुरुवात केली होती. सलामीवीर ख्रिस गेलनेही ६६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ५ षटकार खेचत ७३ धावांची खेळी केली.

परंतु अन्य फलंदाजांकडून त्याला योग्य ती साथ लाभली नाही. गेलनंतर रोव्हमन पॉवेलने नाबाद ७४ धावा करताना वेस्ट इंडिजच्या विजयासाठी संघर्ष केला. मात्र, त्याला अपयश आले. वेस्ट इंडिजला ५० षटकांत ६ बाद २८३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

Story img Loader