क्रिकेट विश्वात धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल लवकरच मराठी चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता कार्तिक शेट्टीचे दिग्दर्शन असलेला ‘ठण ठण गोपाळ’ दाक्षिणात्य अभिनेता कार्तिक शेट्टीचे दिग्दर्शन असलेला ‘ठण ठण गोपाळ’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेल उत्सुक आहे. ख्रिसने गुरूवारी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर यासंबंधी सांगितले. मी भारतात आल्यानंतर ‘ठण ठण गोपाळ’ हा चित्रपट पाहणार असल्याचे गेलने ट्विटरवरील संदेशात म्हटले होते. या चित्रपटात दृष्टिहीन असलेल्या ११ वर्षांच्या मुलाच्या जिद्दीची ही कहाणी दाखविण्यात आली आहे. दृष्टिहीन मुलाची भेट एका वारली चित्रकाराशी होते आणि त्यांची घट्ट मैत्री जमते. पुढे या मुलाच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. विवेक चाबूकस्वार याने ही भूमिका बजावली आहे.

 

Story img Loader