Asia Lions vs World Giants 3rd Match: लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धा दोहा येथे खेळला जात आहे. या स्पर्धेतील सोमवारी आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा डॅशिंग खेळाडू ख्रिस गेल पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने २३ धावांची इनिंग खेळली. पण त्याच्या फटकेबाजीने सर्वांना चकित केले. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आशिया लायन्सने त्याच्या वर्ल्ड जायंट्स संघाला रोमहर्षक सामन्यात पराभूत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ख्रिस गेलने सलग तीन षटकार ठोकले –

खरं तर, दोहामध्ये पावसामुळे आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात खेळला जाणारा सामना १० षटकांचा करण्यात आला होता. त्यामुळे सामन्यात आणखीनच उत्साह वाढला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर आशिया लायन्सने प्रथम फलंदाजी करताना ९९ धावा केल्या. ज्यामध्ये मिसबाह-उल-हकच्या १९ चेंडूत ४४ आणि दिलशानच्या २४ चेंडूत ३२ धावांचे योगदान होते. ज्याचा पाठलाग करताना वर्ल्ड जायंट्सचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलने सलामी दिली. त्याने दमदार फटकेबाजी करताना गोलंदाजाची लाइन-लेंथ बिघडली.

या सामन्यात ख्रिस गेलने सामन्यात चौथे षटक टाकायला आलेल्या तिलकरत्ने दिलशानची धुलाई करण्याचा निर्धार केला होता. ख्रिस गेलने दिलशानच्या गोलंदाजीवार जोरदार हल्ला चढवला. त्याने षटकातील पहिल्या तीन चेंडूत षटकारांची हॅट्ट्रिक केली. गेलने दिलशानचा पहिला चेंडू मिड-विकेट स्टँडकडे फटकवला. त्याचबरोबर दुसऱ्या चेंडूवर त्याने लाँग-ऑन स्टँडवर आणखी एक षटकार मारला. तिसर्‍या चेंडूवर त्याने तिसर्‍या षटकारासाठी लाँग-ऑन स्टँडमध्ये आणखी जोरात फटका मारला.

हेही वाचा – IPL 2023: विराटचा आयपीएलच्या प्रोमो शूटचा VIDEO व्हायरल; गोंगाटात कोहली दिसला वेगळ्या अंदाजात

मात्र, या खेळीनंतरही वर्ल्ड जायंट्सला १० षटकांत ५ गडी गमावून ६४ धावाच करता आल्या. त्यामुळे आशिया लायन्सने ३५ धावांनी सामना जिंकला. आशिया लायन्सकडून कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अब्दुर रझाकने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. सिमन्स आणि गेल व्यतिरिकत्त वर्ल्ड जायंट्सच्या एकाही फलंदाजा दुहेरी आकडा गाठता आला नाही.

आशिया लायन्स प्लेइंग इलेव्हन: उपुल थरंगा (विकेटकीपर), तिलकरत्ने दिलशान, मिसबाह-उल-हक, असगर अफगाण, सोहेल तन्वीर, अब्दुर रज्जाक, शाहिद आफ्रिदी (कर्णधार), पारस खडका, थिसारा परेरा, मोहम्मद हाफीज आणि अब्दुल रज्जाक

हेही वाचा – WTC Final 2023: भारत की ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा सामना कोण जिंकणार? पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने केली मोठी भविष्यवाणी

वर्ल्ड जायंट्स प्लेइंग इलेव्हन: रिकार्डो पॉवेल, शेन वॉटसन, लेंडल सिमन्स, आरोन फिंच (कर्णधार), मॉर्न व्हॅन विक (विकेटकीपर), रॉस टेलर, केविन ओ ब्रायन, जॅक कॅलिस, ख्रिस गेल, मॉन्टी पानेसर, पॉल कॉलिंगवुड

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris gayle hit a hat trick of sixes off the bowling of tillakaratne dilshan in asia lions vs world giants llc 2023 vbm
Show comments