जागतिक क्रिकेटमध्ये एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असलेला ख्रिस गेल एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. यावेळी गेल  क्रिकेटमुळे नव्हे, तर एका गाण्याच्या व्हिडिओमुळे व्हायरल होत आहे. यंदाच्या आयपीएल दरम्यान गेलने ‘जमैका टू इंडिया’ हे गाणे रिलीज केले आहे.

गेलने हे गाणे प्रसिद्ध रॅपर एमिवे बंटाय याच्यासह बनवले आहे. रिलीज होताच गेलचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. ख्रिस गेल मैदानाबाहेरच्या रंगीबेरंगी शैलीसाठी देखील ओळखला जातो. तो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि वेळोवेळी मजेदार व्हिडिओ शेअर करुन तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो.

 

गेलच्या या गाण्यात हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा आहेत. गाण्यातील इंग्रजी रॅप ख्रिस गेल आणि हिंदी रॅप एमिवे बंटायने गायला आहे. या गाण्याचे बोल एमिवे व्यतिरिक्त ख्रिस गेलच्या टीमने लिहिले आहेत, तर संगीत टोनी जेम्स यांनी दिले आहे.

ख्रिस गेल सध्या आयपीएलसाठी भारतात असून पंजाब किंग्ज संघाचा तो एक भाग आहे. आज आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात वानखेडेवर सामना रंगणार आहे. पंजाबकडून गेलला संधी मिळाल्यास तो आज चौकार-षटकारांची आतषबाजी करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

एमिवेच्या यूट्यूब चॅनलवर ख्रिस गेलचे हे गाणे रिलीज झाले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 7,78,005 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे

Story img Loader