Chris Gayle on RCB: इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्टार फलंदाजांनी सजलेल्या आरसीबी या संघाने आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल आणि विराट कोहलीसारखे फलंदाज असलेल्या संघाला आजपर्यंत फायनल का जिंकता आली नाही? ही कोणत्याही संघासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. मात्र आता याचा खुलासा झाला आहे. खरंतर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने स्वतः याबाबत मोठं विधान केलं आहे.
या तीन खेळाडूंमुळे आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही –
जिओ सिनेमाशी बोलताना युनिव्हर्स बॉस म्हणाला की, “आरसीबीने फक्त या तीन खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले. ज्यामुळे बाकीचे खेळाडू बाहेर पडले. तुम्हाला माहित आहे की कधीकधी मुख्य खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले जाते, मी नेहमीच माझ्या स्वतःच्या झोनमध्ये असतो.”
गेल पुढे म्हणाला, “मला जे जाणवले त्यावरून, आरसीबीच्या दृष्टिकोनातून अनेक खेळाडूंना असे वाटते की ते या संघात नाहीत. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि मी या तीन खेळाडूंवर जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे असे घडते. यामुळेच बाकीचे खेळाडू मानसिकदृष्ट्या संघाशी जोडले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे संघासाठी चांगली कामगिरी करण्याचे मोठे आव्हान आहे. ख्रिस गेल २०११-१७ पर्यंत आरसीबीचा भाग राहिला.”
आरसीबीचा आयपीएल प्रवास –
आरसीबीच्या आयपीएल प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, संघाने तीनदा उपविजेतेपद पटकावले आहे, परंतु आतापर्यंत ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरसीबी उपविजेते ठरला होता. सध्या आरसीबीची धुरा फाफ डू प्लेसिसच्या हाती आहे, ज्याने विराट कोहलीच्या नंतर संघाची धुरा सांभाळली आहे.
२६ मार्चला डिव्हिलियर्स आणि गेलचा गौरव होणार –
आरसीबीने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या सन्मानार्थ २६ मार्च रोजी एक कार्यक्रम आयोजित केला आहे, जिथे त्यांची जर्सी सन्मानाची खूण म्हणून कायमची निवृत्त केली जाईल. याआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने सचिन तेंडुलकरची जर्सीही निवृत्त केली आहे.
आयपीएल २०२३ साठी आरसीबी संघ –
फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश वुडल , सिद्धार्थ कौल, आकाश दीप, सोनू यादव, अविनाश सिंग, राजन कुमार, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा, रीस टोपले, मायकल ब्रेसवेल.