India vs Afghanistan World Cup 2023 Updates: भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषकातील नववा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रोहितने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. याशिवाय रोहितने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला. रोहितने आपल्या शतकी खेळीत ५ शानदार षटकार ठोकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता भारतीय कर्णधाराने वेस्ट इंडिजच्या माजी स्फोटक फलंदाजाला मागे टाकले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो पहिल्या स्थानावर आला आहे. त्याचवेळी रोहित शर्माने हा विक्रम केल्यानंतर ख्रिस गेलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याचे खास अभिनंदन केले.

युनिव्हर्स बॉसने दिली खास प्रतिक्रिया –

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केल्यानंतर, ख्रिस गेलने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “अभिनंदन रोहित शर्मा! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार…स्पेशल ४५.” विशेष म्हणजे रोहित आणि गेलचा जर्सी क्रमांकही एकच आहे. दोघांनी ४५ क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. या पोस्टमध्ये गेलने स्वतःचा आणि रोहित शर्माचा ४५ क्रमांकाची जर्सी घातलेला फोटो शेअर केला आहे. गेलची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे.

हेही वाचा – IND vs AFG: विराटसोबत झालेल्या वादावर नवीनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘लोकांनी आणि माध्यमांनी…’

४५३ व्या सामन्यात मोडला ख्रिस गेलचा विक्रम –

रोहित शर्माने आपल्या ४५३व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ही खास कामगिरी केली आहे. आता रोहित शर्माने सामन्यांमध्ये ५५६ षटकार ठोकले आहेत. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने ४८३ सामन्यात ५५३ षटकार ठोकले होते. या यादीत रोहित आणि गेलशिवाय पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे नाव चौथ्या स्थानावर आहे. शाहिद आफ्रिदीच्या नावावर ५२४ सामन्यात ४७६ षटकार आहेत, तर महेंद्रसिंग धोनीच्या नावावर ३५९ षटकार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chris gayle said rohit sharma for hitting the most sixes in international cricket in ind vs afg match vbm
Show comments