भारत म्हणजे बॉलीवूड आणि क्रिकेट हे समीकरण विदेशी व्यक्तींच्या डोक्यात असते. आयपीटीएलमध्ये जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटूंच्या जोडीला बॉलीवूड आणि क्रिकेट अवतरले. मनोरंजनाचा तडका म्हणून रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सानिया मिर्झा यांनी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, आमिर खान आणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यात लुटूपुटूचे टेनिसचे सामने झाले. आमिर खानची सव्‍‌र्हिस सातत्याने जाळ्यावरच जात असल्याने अखेर फेडरर-जोकोव्हिच नेटवर बसले. त्यानंतर आमिरने अचूक सव्‍‌र्हिस केली. या छोटय़ा आणि धमाल खेळाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र केवळ पैसा आणि संयोजकांच्या हट्टापायी महान खेळाडूंनाही या मनोरंजनात्मक प्रकाराला सामोरे जावे लागते, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला.

Story img Loader