छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) या ठिकाणी राहणाऱ्या अकरावीतल्या मुलीने विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीसाठी उपवास करण्यास सुरुवात केली आहे. साक्षी रवींद्र काळे पाटील असं या मुलीचं नाव आहे. ती विराट कोहलीची फॅन आहे. विश्वचषक स्पर्धेत विराटने चांगली कामगिरी करावी म्हणून तिने उपवास सुरु केले आहेत.
साक्षीने उपवास का सुरु केले?
विश्वचषक सुरू झाल्यानंतर भारताची कामगिरी चांगली असावी असं साक्षीला वाटत होतं, त्यात विराट कोहली खूप आवडत असल्याने त्याची कामगिरी चांगली असावी, असा तिला वाटत होतं म्हणून तिने रेणुका मातेचे मंगळवार करायला सुरुवात केली. भारताने चांगली कामगिरी सुरू केली. मात्र विराट कोहलीला सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाची बरोबरी करताना अडचणी आल्या. त्यामुळे साक्षीने रोज उपवास करायला सुरुवात केली. प्रत्येक सामन्यात विराट चांगला खेळावा अस तिला मनोमन वाटत होते आणि सध्या तो चांगली कामगिरी करतो आहे. कोहलीने स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी ४९ व शतक झळकावले आणि विश्वविक्रमाची बरोबरी केली. मात्र विराट कोहलीने यापुढेही विक्रम करावेत यासाठी साक्षीने देवीला नमस्कार करेन आणि एकवेळ उपवास करेन असा नवस केला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूसाठी त्याचे फॅन काय करु शकतात हे साक्षीच्या उदहरणातून कळतं आहे.
साक्षी कशी झाली कोहलीची फॅन?
देवगिरी महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात साक्षी शिक्षण घेते. वयाच्या नवव्या वर्षापासून ती क्रिकेट पाहू लागली. सुरुवातीला क्रिकेटमधलं तिला फार काही कळत नव्हतं. मात्र वडील क्रिकेटचे सामने पाहत असताना तिला देखील खेळाबाबत आवड निर्माण झाली. त्यात विराट कोहली खेळताना ती पाहू लागली आणि त्याच्यावर तिला विश्वास निर्माण झाला. हळूहळू इंटरनेटच्या माध्यमातून कोहलीचे वेगवेगळे पैलू अभ्यासण्यास तिने सुरुवात केली आणि त्यातच ती त्याची फॅन झाली. त्याच्या दैनंदिन घडामोडी, आहार, व्यायाम याबाबत माहिती घेत असते. त्याच्यातील आक्रमकपणा साक्षी काळेला अधिक भावतो. त्यामुळे तिने स्वतः महाविद्यालयात खेळाचे धडे घ्यायला सुरुवात केली आहे. कोहली जगातील सर्वात चांगला खेळाडू आहे. नकारात्मक वेळ असताना तिथे ऊर्जा निर्माण करून चांगली कामगिरी तो करतो म्हणून आपल्याला आवडत असल्याचे मत साक्षी काळेने व्यक्त केले आहे.
मी विराटची खूप मोठी फॅन आहे. विश्वचषक सुरु झाल्यावर मी दर मंगळवारी उपवास करायचे. पण मी आता विराटसाठी रोज उपवास करते आहे. त्याचा फॉर्म सुधारला आहे याचा मला आनंद आहे. विराटचं शतक तीनवेळा हुकलं त्यामुळे मी आता रोज उपवास करते आहे. एक वेळ जेवण करुन मी रात्री काहीही खात नाही. विराट ५० वं शतक झळकवेल अशी मला खात्री आहे. त्याचा फिटनेस, त्याची शिस्त, त्याचं डाएट या सगळ्या गोष्टही मला आवडते असंही साक्षीने म्हटलं आहे.
साक्षीने सुरुवातीला मला सांगितलं नव्हतं की मंगळवारी उपवास करते आहे. पण नंतर तिने मला सांगितलं की मी विराट कोहलीसाठी उपवास करते आहे. मला क्रिकेटमधलं फार काही कळत नाही पण माझ्या मुलीने विराटसाठी उपवास करण्यास सुरुवात केली आहे असं साक्षीची आई लता रवींद्र काळे यांनी म्हटलं आहे.