सुरेश रैनाच्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर मात करत चॅम्पियन लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावले. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथ आठ धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर सुरेश रैना आणि ब्रेंडन मॅक’क्युलम जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १२.२ षटकांतच ११८ धावांची वेगवान भागीदारी करत विजयाचा पाया रचला. ६२ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी करणारा रैना चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. धोनीने १४ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २३ धावा केल्या. तत्पूर्वी कोलकाताने गौतम गंभीरच्या ८० धावांच्या खेळीच्या आधारे १८० धावांची मजल मारली. पवन नेगीने २२ धावांत ५ बळी घेतले. नेगीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सुरेश रैनाला मालिकावीर आणि गोल्डन बॅट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ६ बाद १८० (गौतम गंभीर ८०, रॉबिन उथप्पा ३९, पवन नेगी ५/२२) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : १८.३ षटकांत २ बाद १८५ (सुरेश रैना नाबाद १०९, ब्रेंडन मॅक’क्युलम ३९)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा