धडाक्यात सुरुवात करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाला त्यानंतर पराभव स्वीकारावा लागल्याने सोमवारी ब्रिस्बेनविरुद्ध होणारा सामना त्यांच्यासाठी ‘जिंकू किंवा हरू’ असाच असेल. कारण हा सामना जिंकल्यावर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दार किलकिले होऊ शकते. हा सामना जिंकल्यावर त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाने टायटन्स संघाला पराभूत केले आणि त्यानंतर त्रिनिदादचा संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभूत झाला तरच हैदराबादचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, पण जर टायटन्सने त्रिनिदादला पराभूत केले तर हैदराबादचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
डेल स्टेन, डॅरेन सॅमी, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांच्यावर हैदराबादच्या गोलंदाजीची धुरा असेल. तर फलंदाजीमध्ये थिसारा परेरा चांगल्या फॉर्ममध्ये असून शिखर धवनला अजूनही लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नाही.
ब्रिस्बेनचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून जेम्स होप्स आणि कंपनीसाठी हा फक्त एक औपचारिक सामना असेल.
हैदराबादसाठी जिंकू किंवा हरू
धडाक्यात सुरुवात करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादच्या संघाला त्यानंतर पराभव स्वीकारावा लागल्याने सोमवारी ब्रिस्बेनविरुद्ध
First published on: 30-09-2013 at 04:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clt20 its a do or die battle for sunrisers hyderabad against brisbane heat