चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद हे दक्षिण भारतातील प्रबळ संघ मंगळवारी आमनेसामने असतील. चेन्नईच्या संघाने पहिल्या सामन्यात १८५ धावांचे आव्हानही पार केले होते. फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही चेन्नईचा संघ सक्षम आहे, तर हैदराबादने त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाविरुद्ध स्पर्धेतील पहिला विजय मिळवला तो थिसारा परेराच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर. दोन्हीही संघ तुल्यबळ समजले जात असले तरी या सामन्यासाठी हैदराबादपेक्षा चेन्नईलाच प्रेक्षकांची अधिक पसंती असेल.
मुंबई-लायन्स सामना जयपूरला होणार
जयपूर : गुजरातमधील अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर मुंबई इंडियन्स आणि हायव्हेल्ड लायन्स यांच्यात अहमदाबादला होणारा चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेचा सामना जयपूरला हलवण्यात आला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष महेंद्र शर्मा यांनी ही माहिती दिली. अहमदाबादला ३० सप्टेंबरला आणखी दोन सामने होणार आहेत. या सामन्यांचा निर्णयही येत्या काही दिवसांत घ्यावा लागणार आहे.

Story img Loader