पात्रता फेरीत पहिले दोन्ही सामने जिंकलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ मंगळवारी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या मुख्य फेरीतील पहिल्या सामन्यात उतरेल तो विजयाच्या सूर्योदयासाठीच. मंगळवारी त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाशी हैदराबादचा पहिला सामना होणार आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ जेतेपदाला गवसणी घालतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हैदराबादच्या फलंदाजीचा शिखर हा पाया आहे, त्याचबरोबर त्यांची मदार कॅमेरुन व्हाइट, जे.पी.डय़ुमिनी आणि पार्थिव पटेल यांच्यावर असेल. तर गोलंदाजीमध्ये डेल स्टेन हे त्यांचे प्रमुख अस्त्र असून भारताच्या अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांची प्रभावी साथ स्टेनला मिळू शकेल. त्याचबरोबर डॅरेन सॅमीसारखा अनुभवी गोलंदाजही त्यांच्याकडे आहे.
त्रिनिदादच्या संघाची मुख्यत्वेकरून धुरा गोलंदाजीवर असेल. कारण सुनील नरीन आणि रवी रामपॉल यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीमध्ये डॅरेन ब्राव्होसारखा दमदार फलंदाज आहे. त्याचबरोबर कर्णधार दिनेश रामदिनकडूनही संघाला मोठय़ा अपेक्षा असतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा