Sachin Tendulkar Statue At Wankhede Stadium : भारतरत्न सचिन तेंडुलकरचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर त्याच्या भव्य पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी स्टेडियमवर त्याच्या चाहत्यांनी सचिनच्या नावाचा जषघोष केला. अनेक वर्षांनंतर वानखेडे मैदानावर सचिन…सचिन…चा जयघोष ऐकायला मिळाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील सामन्याच्या पूर्वसंध्येला सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर सचिनचा १४ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पवार, स्वतः भारतरत्न सचिन तेंडुलकर, सचिनची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकर, बीसीसीआयचे सचिव जय शाह, माजी आमदार आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती अपेक्षित आहे.

हे ही वाचा >> भारताच्या मदतीने पाकिस्तान विश्वचषक उपांत्य फेरीत? IND vs SL सामन्यानंतर अशी बदलतील गणितं

अहमदनगर येथील प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी सचिन तेंडुलकरचा हा पूर्णाकृती पुतळा साकारला आहे. पुतळ्याबद्दल माहिती देताना प्रमोद कांबळे म्हणाले, पुतळा कसा असावा यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. मी सचिनला विचारले की पुतळा कसा बनवायचा. यानंतर आम्ही त्याची एक पोझ फायनल केली, ज्यामध्ये तो षटकार मारताना दिसत आहे. आम्ही आधी एक लहान मॉडेल बनवलं. त्यानंतर आता १४ फूट उंच पुतळा बनवला आहे. जगाचा नकाशा आणि क्रिकेट बॉलचे ग्राफिक्स असलेला एक ग्लोब तयार केला आहे आणि त्याच्या वर सचिन तेंडुलकरचे प्रतीकात्मक चित्रण केले आहे. आम्ही एक पॅनेल देखील सेट केला आहे, जो त्याच्या कारकिर्दीबद्दल माहिती देईल.’

Story img Loader