CM Naveen Patnaik announced a one crore prize to the Indian team: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खेळावरील प्रेम सर्वश्रुत आहे. जागतिक स्तरावर भारतीय हॉकी संघाच्या सुधारित कामगिरीमागेही नवीन पटनायक यांचा हात कुठेतरी असल्याचे मानले जाते. हॉकीसोबतच नवीन पटनायक आता भारतीय फुटबॉलच्या प्रचारातही व्यस्त आहेत. भारतीय फुटबॉल संघाने १८ जून २०२३ रोजी ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे लेबनॉनचा पराभव करून इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला.

यानंतर नवीन बाबू म्हणून प्रसिद्ध असलेले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी देशातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींची मने जिंकणारी घोषणा केली. नवीन पटनायक यांनी इंटरकॉन्टिनेंटल चषकचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय पुरुष फुटबॉल संघासाठी एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
South Africa announce Champions Trophy squad Temba Bavuma to Lead
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, एडन मारक्रम नाही तर ‘हा’ खेळाडू कर्णधार
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…

भारताकडून कर्णधार सुनील छेत्री आणि लल्लिन्झुआला छांगटे यांनी गोल केले. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सुनील छेत्रीने ४६व्या मिनिटाला भारताला आघाडी मिळवून दिली. सुनील छेत्रीचा हा ८७ वा आंतरराष्ट्रीय गोल आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या सक्रिय फुटबॉलपटूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ६६व्या मिनिटाला लॅलिंझुआला छांगटेने संघाची आघाडी दुप्पट केली.

हेही वाचा – IND vs PAK: “आता भारताची पाळी…”; वनडे विश्वचषकाबद्दल बोलताना जावेद मियांदादने पुन्हा ओकली गरळ

इंटरकॉन्टिनेंटल चषकाचे आयोजन करणे हा आमचा सन्मान –

नवीन पटनायक समापन समारंभात म्हणाले, “आमच्या राज्यासाठी प्रतिष्ठित इंटरकॉन्टिनेंटल चषक आयोजित करणे ही खूप अभिमानाची बाब आहे.” नवीन पटनायक पुढे म्हणाले, “कठीण स्पर्धेच्या दरम्यान भारताच्या विजयासाठी अभिनंदन. ओडिशा आणि भारतातील खेळाच्या वाढीस मदत करण्यासाठी ओडिशामध्ये आणखी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”

हेही वाचा – ENG vs AUS: उस्मान ख्वाजाला बाद करण्यासाठी इंग्लडने रचले होते चक्रव्यूह, छत्रीसारख्या क्षेत्ररक्षणाचा VIDEO व्हायरल

ओडिशा सरकारचे आभार –

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष कल्याण चौबे यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ओडिशा सरकारचे आभार मानले. कल्याण चौबे म्हणाले, “आम्ही इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेसाठी यापेक्षा चांगले ठिकाण मागू शकलो नसतो. सहभागी संघांना सर्व प्रकारचे समर्थन आणि आदरातिथ्य प्रदान केल्याबद्दल आणि एक अप्रतिम स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी ओडिशा सरकारचे आभार मानतो.”

Story img Loader