एफआयएच जागतिक हॉकी लीगमध्ये भारताने शनिवारी फ्रान्सवर ३-२ अशा फरकाने आश्चर्यकारक विजयाची नोंद केली. भारताचे प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांनी या विजयाबाबत समाधान प्रकट केले आहे. ‘अ’ गटातील सलामीचा सामना इतका सोपा असेल, याची अपेक्षा केली नव्हती. परंतु भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरीचा प्रत्यय घडवत पूर्ण गुणांची कमाई केली, असे अ‍ॅस यांनी सांगितले.
‘‘कोणत्याही स्पध्रेतील पहिला सामना जिंकणे महत्त्वाचे असते. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूंना फारशी आक्रमणाची संधी दिली नाही. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडत तिसरा गोल साकारला आणि विजयाचे पूर्ण गुण वसूल केले,’’ अशी प्रतिक्रिया व्हॅन अ‍ॅस यांनी सामन्यानंतर व्यक्त केली. ‘‘कोणत्याही स्पध्रेच्या प्रारंभी नेहमी पूर्वानुमान मांडता येत नाही,’’ असे ते पुढे म्हणाले.भारताचा पुढील सामना २३ जूनला पोलंडविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानने पोलंडला २-१ असे हरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा