Rahul Dravid Dance : इंग्लंडमध्ये एकदिवसीय आणि टी २० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारतीय संघाला तिथेही एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळायच्या आहेत. मंगळवारी (१९ जुलै) रात्री भारतीय संघ वेस्ट इंडीजसाठी रवाना झाला. कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सोबत निवड झालेले खेळाडू त्रिनिदादमध्ये दाखल झाले. या दरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रशिक्षक द्रविडला खेळाडूंनी चक्क आपल्या तालावर नाचवल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाला २२ जुलैपासून वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा शिखर धवनकडे देण्यात आली आहे. शिखर धवन आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. मजेशीर व्हिडीओ तयार करून सोशल मीडिया पोस्ट करणे, हा त्याचा आवडता छंद आहे. अनेकदा सहकारी खेळाडूंसोबत तो व्हिडीओ करताना दिसतो. खेळाडूही या मजेशीर व्हिडीओंमध्ये सहभाग घेतात. यावेळी मात्र, प्रशिक्षक राहुल द्रविड संघातील मस्तीखोर टोळक्याच्या तावडीत सापडले आहेत.
अतिशय शांत आणि धीरगंभीर असलेला राहुल द्रविड अशा प्रकारच्या डान्स अॅक्टिव्हिटीपासून कायम चार हात लांबच असतो. मात्र, यावेळी खेळाडूंनी त्याला सोडले नाही. खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकालाही आपल्या डान्स व्हिडीओमध्ये सहभागी करून घेतले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये संघाचे सर्व खेळाडू एक डान्स स्टेप करताना दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी राहुल द्रविडही खेळाडूंप्रमाणे कूल स्टेप करताना दिसत आहे. विशेष म्हणेज आपल्या या कृतीवर द्रविड स्वतःच हसतानाही दिसत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवाना झालेला संघ – शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.