पीटीआय, लॉडरहिल

वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकेतील मिळालेल्या पराभवानंतर तळाची फलंदाजी अधिक भक्कम करण्यावर भर राहील, असे भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले. भारताने या मालिकेत अर्शदीप सिंग, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव व मुकेश कुमार यांना संघात स्थान दिले. त्यामुळे तळाची फलंदाजी ही कमकुवत झाली. अष्टपैलू अक्षर पटेल सातव्या स्थानावर फलंदाजीस उतरला. मालिकेच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघ अखेरच्या काही षटकांमध्ये जलदगतीने धावा करू शकला नाही. भारताने ९ बाद १६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. विंडीजने दोन षटके शिल्लक राखत विजय नोंदवला.

Rohit Sharma to miss first Test against Australia Jasprit Bumrah to captain in Perth Devdutt Padikkal will be added in Team
IND vs AUS: रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर, BCCIला दिली माहिती; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूला संघात स्थान मिळणार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!

‘‘जो संघ आम्ही सामन्यात उतरवला होता, त्यामुळे आम्हाला संघ संयोजनात बदल करण्याची सूट मिळाली नाही. मात्र, काही विभागांत आम्ही नक्कीच सुधारणा करू शकतो. तळाची फलंदाजी आणखी चांगली कशी करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. मात्र, हा असा विभाग आहे, ज्यावर अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे. आम्ही गोलंदाजी कमकुवत करू शकत नाही मात्र, तळाच्या काही फलंदाजांनी योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे द्रविडने सांगितले.

भारताच्या तळाच्या फलंदाजांनी निराशा केली असताना विंडीजकडून अष्टपैलू अल्जारी जोसेफ ११व्या स्थानी फलंदाजीस येत होता. द्रविड याबाबत म्हणाला, ‘‘या प्रारूपात संघ मोठी धावसंख्या उभारताना दिसत आहेत. तुम्ही विंडीज संघाकडे पाहिल्यास जोसेफ ११व्या स्थानी फलंदाजी करण्यासाठी येतो आणि मोठे फटके मारण्यासही सक्षम आहे. अनेक संघ आहेत, ज्यांची तळाची फलंदाजी चांगली आहे. निश्चितपणे याबाबतीत आमच्यासमोर काही आव्हाने आहेत आणि आम्हाला त्याच्यावर काम करणेही गरजेचे आहे. आमची तळाची फलंदाजी आणखी भक्कम करणे गरजेचे असल्याचे या मालिकेतून आम्हाला कळाले.

आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेपूर्वी आता एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. जसप्रीत बुमरा, केएल राहुल व श्रेयस अय्यरसह जायबंदी झालेल्या खेळाडूंना आशिया चषक स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

पदार्पणवीरांचे द्रविडकडून कौतुक

तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार यांनी या ट्वेन्टी-२० मालिकेत पदार्पण केले आणि द्रविड या तिघांच्याही कामगिरीने प्रभावित असून त्याने या खेळाडूंचे कौतुकही केले. ‘‘पदार्पण करणाऱ्या या तीनही खेळाडूंनी आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. यशस्वीने चौथ्या सामन्यात चांगली खेळी केली. ‘आयपीएल’मध्ये त्याने जी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही करून दाखवली. तिलकने मध्यक्रमात चमकदार कामगिरी केली. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून सावरत सकारात्मक फलंदाजी केली. मुकेशने सर्व प्रारूंपात चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली,’’ असे द्रविड म्हणाला.