Rahul Dravid on Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा वन डे फॉरमॅटमधील फॉर्म गेल्या वर्षभरात भारतीय संघासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेतील तीन सामन्यात खातेही उघडू न शकलेल्या सूर्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अशीच कामगिरी केली आहे. आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही त्याच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे, मात्र सूर्याची क्षमता पाहता त्याला आणखी संधी देण्याचा विचार करत आहे.

मिळत असलेल्या संधीचा फायदा घ्या- राहुल द्रविड

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्याने अनुक्रमे १९ आणि २४ धावा केल्या. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्याच्या कामगिरीबद्दल सांगितले की, “मला वाटते सूर्यकुमार यादव निश्चितच एक महान खेळाडू आहे आणि हे त्याच्या कामगिरीतून दिसून येते. सूर्याने टी२० क्रिकेट, व्हाईट बॉल क्रिकेट, आयपीएल आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्येही काही उत्कृष्ट खेळी केल्या आहेत आणि त्या आपण पहिल्या आहेत.”

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Sam Constas statement about Indian bowlers sports news
भारतीय गोलंदाजांसाठी माझ्याकडे योजना तयार -कोन्सटास

हेही वाचा: Rohit Sharma: हिटमॅनवर कॅप्टन्सीचे प्रेशर? वर्ल्डकप आधीच रोहित शर्माचे उडाले डोक्यावरील केस, फोटो व्हायरल

भारताचा माजी खेळाडू आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “दुर्दैवाने मला असे वाटते की तो जे काही चांगल आणि वाईट होते ते प्रामाणिकपणे कबूल करणारा पहिला खेळाडू आहे. सूर्याची एकदिवसीय प्रकारात फारशी चांगली कामगिरी झालेली नाही, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, त्याचे टी२० क्रिकेटमध्ये आकडे पाहिले तर सर्वकाही सांगतात. आतापर्यंत टी२० फॉर्मेटमध्ये तो ज्या पद्धतीने खेळतो तशी कामगिरी काही त्याला करता आलेली नाही. परंतु. तो फक्त शिकण्याच्या प्रक्रियेतून जात आहे.”

संधीचे सोने करणे त्यांच्यावर अवलंबून आहे- राहुल द्रविड

सूर्यकुमार यादवला सतत संधी देण्याच्या प्रश्नावर प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, “आम्ही त्याला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करू. आता या संधीचा तो कसा फायदा घेतो हे त्याच्यावर अवलंबून आहे. युवा खेळाडूंनी मिळत असलेल्या संधीचा फायदा घ्या, अन्यथा त्यांचे खूप मोठे नुकसान होईल. मला वाटते की तो अजूनही वन डे फॉरमॅटमध्ये मधल्या षटकांमध्ये फलंदाजी कशी करायची हे शिकत आहे.” माहितीसाठी की, मिस्टर ३६० डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादव सध्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर-१ खेळाडू आहे पण, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये गेल्या एका वर्षात त्याची सरासरी १३च्या आसपास आहे.

हेही वाचा: IND vs WI: स्वत: च्या नावाची जर्सी मिळेना अन् फॉर्मही काही केल्या गवसेना! सूर्यकुमार यादवला पुन्हा संधी मिळणार?

आता वन डेत आणखी संधी सूर्यकुमारला मिळायला हवी का?

जुलै २०२१ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवसाठी आतापर्यंत हे फॉर्मेट फारसे चांगले राहिलेले नाही. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या २५ सामन्यांच्या २३ डावांमध्ये सूर्याने केवळ २३.८०च्या सरासरीने ४७६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ २ अर्धशतक केले आहेत. अशा परिस्थितीत त्याला वन डेत संधी मिळणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आगामी आशिया चषक आणि विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सूर्याचा फॉर्म संघासाठी खूपच चिंताजनक आहे.

Story img Loader