टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यांच्या कारकिर्दीत टीम इंडियाने अनेक उंची गाठल्या. रवी शास्त्री आणि विराट कोहली या जोडीनं रेड बॉल क्रिकेटमध्ये जवळपास सर्वच देशात विजय प्रस्थापित केला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने एकूण ४३ कसोटी सामने खेळले असून २५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर १३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्याचबरोबर ५ सामने अनिर्णित ठरले आहेत. रेड बॉल व्यतिरिक्त व्हाईट बॉल क्रिकेटमध्येही टीम इंडियाचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. रवी शास्त्री यांच्या कारकिर्दीत टीम इंडियाने एकूण ७९ एकदिवसीय सामने खेळले. त्यापैकी ५३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर २३ सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. त्याचबरोबर टी २० क्रिकेटमध्ये एकूण ६८ सामने खेळले. त्यापाकी ४४ सामन्यात विजय, तर २० सामन्यात हार पत्कारावी लागली. तर दोन सामने अनिर्णित ठरले. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात टीम इंडियाची घोडदौड सुरुच होती. मात्र आयसीसीचा कोणताही किताब जिंकता आला नाही. याची सळ माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या मनात कायम आहे. आता माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी निवृत्तीनंतर काही दिवसांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा