बुडापेस्ट : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दुहेरी गोलमुळे मंगळवारी युरो चषक फुटबॉल स्पध्रेत पोर्तुगालने हंगेरीविरुद्ध दिमाखदार विजयाची नोंद करीत लक्ष वेधले. या सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत रोनाल्डोने कोका-कोलाच्या दोन बाटल्या दूर केल्याच्या कृतीमुळे त्यांना चार अब्ज डॉलरचा फटका बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तंदुरुस्तीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या युव्हेंटसचा किमयागार आक्रमक ३६ वर्षीय रोनाल्डोने पत्रकार परिषदेत त्याच्या पुढय़ातील कोका-कोलाच्या दोन बाटल्या उचलून दूर ठेवल्या आणि पाण्याची बाटली जवळ ठेवली. ही कृती करताना रोनाल्डोने पोर्तुगीज भाषेत ‘‘एगुआ’’ म्हणजेच ‘‘पाणी प्या’’ असा संदेश दिला. रोनाल्डोच्या कृतीची चित्रफीत मग समाजमाध्यमांवर पसरली.

रोनाल्डोच्या भूमिकेमुळे युरो-२०२०च्या अधिकृत पुरस्कर्त्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलाच्या समभागांचे त्वरित ५६.१० डॉलरवरून ५५.२२ डॉलरइतके भाव घसरले. कोका-कोलाचे बाजार मूल्यांकन २४२ अब्ज डॉलरवरून २३८ अब्ज डॉलपर्यंत घसरले आहे. म्हणजेच चार अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. ‘‘प्रत्येकाला आपल्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि गरजेनुसार पिण्याच्या पसंती ठरवण्याचा अधिकार आहे,’’ अशी प्रतिक्रिया कोका-कोलाने व्यक्त केली आहे.

गतवर्षी डिसेंबर महिन्यातही रोनाल्डोने कार्बन डायऑक्साइडयुक्त पेयांबाबतच्या आपल्या तीव्र भावना प्रकट केल्या होत्या. ‘‘माझ्या मुलामध्ये महान फुटबॉलपटू बनण्याची क्षमता आहे. तो काही वेळा कोक पितो आणि कुरकुरीत पदार्थ खातो आणि त्यामुळे माझी चिडचिड होते,’’ असे ट्वीट रोनाल्डोने केले होते. रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने यंदाच्या युरो चषकातील पहिल्या लढतीत हंगेरीवर ३-० अशी मात केली.