काही गोष्टी विलक्षण, अविस्मरणीय, अद्भुत, अप्रतिम या शब्दांपुढेही जाऊन स्वर्गीय आनंद देणाऱ्या ठरतात.. क्रिकेटविश्वात असाच एक सुवर्णाध्याय ऑस्ट्रेलियाला चारी मुंडय़ा चीत करत भारतीय संघाने रविवारी लिहिला तो दिल्लीतील चौथा कसोटी सामना सहा विकेट्सने जिंकत.. भारताच्या ८१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा विजय साकारण्याची किमया महेंद्रसिंग धोनीच्याच नेतृत्वाखाली साधली. गतवर्षी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने ०-४ अशा फरकाने दारुण पराभव पत्करला होता, त्या पराभवाची ४-० अशी परतफेड करत भारताने करताना समस्त भारतीयांना होलिकोत्सवाची सुखद भेट दिली.
पहिली कसोटी ’ चेन्नई
धोनीच्या तालावर
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी (२२४ धावा)
महेंद्रसिंग धोनीने वेगवान द्विशतकी खेळी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. धोनीच्या या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आणि हीच आघाडी भारताच्या विजयात निर्णायक सिद्ध झाली.
दुसरी कसोटी ’ हैदराबाद
चेतेश्वर कृपा!
सामनावीर : चेतेश्वर पुजारा (२०४ धावा)
चेतेश्वर पुजाराने साकारलेल्या शानदार द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने दणदणीत विजय साकारला. या खेळीदरम्यान त्याने मुरली विजयसह ३७० धावांची मॅरेथॉन भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नामोहरम केले.
तिसरी कसोटी ’ मोहाली
पदापर्णातच शिखर!
सामनावीर : शिखर धवन (१८७ धावा)
पदार्पणाच्या कसोटीतच १८७ धावांची तडाखेबंद खेळी पेश करत शिखर धवनने दणक्यात सलामी दिली. त्याच्या
या खेळीनेच विजयाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले आणि मालिका विजयही निश्चित झाला.
चौथी कसोटी ’ दिल्ली
न भूतो न भविष्यती
सामनावीर : रवींद्र जडेजा
(सामन्यात ७ बळी)
सात बळींसह उपयुक्त धावा करणारा रवींद्र जडेजा विजयाचा शिल्पकार ठरला. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्यात त्याने निर्णायक भूमिका बजावली.
विजयाची रंगपंचमी
काही गोष्टी विलक्षण, अविस्मरणीय, अद्भुत, अप्रतिम या शब्दांपुढेही जाऊन स्वर्गीय आनंद देणाऱ्या ठरतात.. क्रिकेटविश्वात असाच एक सुवर्णाध्याय ऑस्ट्रेलियाला चारी मुंडय़ा चीत करत भारतीय संघाने रविवारी लिहिला तो दिल्लीतील चौथा कसोटी सामना सहा विकेट्सने जिंकत..
First published on: 25-03-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colourful victory