‘राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे अत्यंत कठीण आहे. पदार्पणापेक्षा पुनरामगन करणे अवघड आहे. ३७व्या वर्षी मी राष्ट्रीय संघात परतलो आहे. वेगवान गोलंदाजांसाठी सातत्यपूर्ण प्रदर्शन करणे आव्हानात्मक आहे’, मत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट डोळ्यासमोर ठेऊन मी खेळत होतो. दररोज तुमच्यावर दडपण असते’. विश्वचषकाच्या तयारीबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेन्टी-२० सामने होत नाहीत. आयपीएल स्पर्धा उपयुक्त ठरते. जेवढे जास्त सामने होतात, तशी कामगिरीत सुधारणा होत जाते. युवा खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव अनोखा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा