४ ते १५ एप्रिल दरम्यान ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर, साखळी फेरीत सोपं आव्हान आलेलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचा समावेश अ गटात करण्यात आलेला असून यात भारतासोबत पाकिस्तान, स्कॉटलंड, आणि श्रीलंका या देशांचाही समावेश आहे. एकूण १६ देशांना ४ गटांमध्ये विभागण्यात आलेलं आहे.

भारताचा समावेश अ गटात झाला असल्याने इतर गटांमध्ये स्पर्धा तुल्यबळ होणार असे संकेत मिळत आहेत. ब गटात सिंगापूर, मॉरिशीअस, झांबिया आणि जमैका यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर क गटात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मलेशिया, कॅनडा, सेशल्स आणि घाना यांना ड गटात स्थान देण्यात आलेलं आहे. प्रत्येक संघाला महीला आणि पुरुष गटांमध्ये एकेरी आणि दुहेरीचे सामने खेळायचे आहेत.

प्रत्येक गटातले आघाडीवर असणारे २ संघ हे बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू कशी कामगिरी करतात याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलेलं असणार आहे.

अवश्य वाचा –  इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला उपविजेतेपद

Story img Loader