इंग्लंडमधील बर्मिंगहममध्ये सध्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची धूम सुरू आहे. भारताच्या मीराबाई चानू, संकेत सरगन यांनी पदक मिळवून भारताची कामगिरी उंचावली आहे. पीव्ही सिंधू, बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांसारख्या बड्या भारतीय खेळाडूंवर आता सर्वांची नजर आहे. पण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १४ वर्षीय स्क्वॉशपटू अनाहत सिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनाहत ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू ठरली आहे.

अनाहतने शुक्रवारी महिला एकेरीच्या ६४ राउंडमध्ये वयाने आपल्यापेक्षा फार मोठ्या असलेल्या जेसा रॉसला सलग तीन गेममध्ये पराभूत केले. त्यानंतर सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळाल्या. १३ मार्च २००८ रोजी दिल्लीत जन्मलेल्या अनाहत सिंगला स्क्वॉश खेळण्याची प्रेरणा तिची मोठी बहीण अमीराकडून मिळाली. अमीराने एकोणीस वर्षांखालील स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे.

shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Sanju Samson Creates History With 2nd Consecutive T20I Century Becomes First Indian Batsman IND vs SA
Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

हेही वाचा – IND W Vs PAK W T20 Live in CWG 2022 : आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान लढत; थोड्याच वेळात होणार नाणेफेक

अनाहतचे वडील गुरशरण सिंग हे वकील आहेत तर आई तानी सिंग इंटेरिअर डिझायनर आहेत. अनाहतने वयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटनपासून सुरुवात केली होती. नंतर तिने बॅडमिंटनऐवजी स्क्वॅशमध्ये कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला. तिने बॅडमिंटनमध्ये दिल्लीतील काही युवा स्तरावरील स्पर्धाही जिंकलेल्या आहेत. अनाहत ही सध्या इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. अनाहत सिंगने ईएसपीएनला सांगितले की, “सुरुवातीला अनुभवी खेळाडूंसोबत शिबिरात राहून मी घाबरलो होतो. पण, ते खरोखरच प्रेमळ आणि मदत करणारे होते. त्यांनी मला खूप मदत केली.”

स्क्वॅशमध्ये आल्यानंतर अल्पावधीतच अनाहतने ११ वर्षांखालील आणि १३ वर्षांखालील खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आली. २०१९मध्ये ब्रिटिश ओपनमध्ये ११ वर्षांखालील गटात तिने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदकाची कमाई केली.

अनाहताने या वर्षी जूनमध्ये थायलंड आशियाई ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये १५ वर्षांखालील गटात सुवर्णपदक जिंकले होते. चेन्नईतील राष्ट्रीय शिबिरात चमकदार कामगिरी करत अनाहत सिंगने बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय स्क्वॅश संघात स्थान मिळवले. तिने सहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत ४६ सर्किट विजेतेपदं , दोन नॅशनल सर्किट विजेतेपदं, दोन नॅशनल चॅम्पियनशिप आणि आठ आंतरराष्ट्रीय विजेतेपदं जिंकली आहेत.