Mirabai Chanu won Gold Medal : बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी (३० जुलै) महाराष्ट्राच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले. त्यानंतर आता भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मीराबाई चानूने २२ व्या राष्ट्रकूल स्पर्धेमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ४९ किलो वजनी गटात चानूने ही धडाकेबाज कामिगिरी केली आहे. मीराबाईने स्नॅच राऊंडमध्ये ८८ किलो वजन उचलले. तर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये ११३ किलो वजन उचलले. म्हणजेच सुवर्णपदक जिंकण्यासाठी तिने एकूण २०१ किलो वजन उचलले. याआधीही चानूने गोल्डकोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

पाहा व्हिडीओ –

याआधी महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारतासाठी पदकांचे खाते उघडले. त्याने वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी गटात ही कामगिरी केली. संकेत सरगरनंतर पुरुष वेटलिफ्टिंगच्या ६१ किलो वजनी गटात गुरुराजा पुजारी यानेदेखील कांस्यपदक मिळविले.