भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केली आहे. त्याने ६५ किलो वजनी गटात कॅनडाच्या लॅचलॅन मॅकनेलीला ९-२ अशा मोठ्या फरकाने पराभूत करून भारताला या स्पर्धेतील कुस्तीमधील पहिले तर एकूण सहावे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. याव्यतिरिक्त भारताच्या अंशू मलिकने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. अंशूला नायजेरियाच्या ओडुनायो फोलासाडे विरुद्ध पराभव पत्करावा लागला.
भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्ट्रकुल स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत भारताला कुस्तीमधील पहिले तसेच एकूण सहावे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने ६५ किलो वजनी गटात ही नेत्रदीपक कामगिरी केली असून कॅनडाचा प्रतिस्पर्धी लॅचलॅन मॅकनेली याला ९-२ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. आधीही बजंरग पुनियाने २०१८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत चांगला खेळ कर सुवर्णपदक जिंकले होते. तर २०१४ सालच्या कॉमनवेल्थ गेममध्ये त्याने रौप्यपदकाची कमाई केली होती .
साक्षी मलिकनेही मिळवले सुवर्णपदक
बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनेदेखील दिमाखदार खेळ करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिने ६२ किलो गटात ही कामगिरी करुन दाखवली आहे. साक्षी मलिकने अवश्वसनीय पद्धतीने विजय मिळवला आहे. ती ०-४ अशा गुणांनी पिछाडीवर होती. मात्र सामना अंतिम टप्प्यात असताना तिने दिमाखदार चाली खेळत प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला गरद केले. सुरुवातीला ०-४ अशा पिछाडीवर असूनही तिने सुवर्णपदकापर्यंत मजल मारली.
अंशू मिलकने जिंकले रौप्य पदक
बजरंग पुनियाच्या अगोदर अंशू मलिकने महिला कुस्तीमील ५७ किलो गटात रौप्य पदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात नायजेरियाच्या ओडुनायोने तिला पराभूत केले. नायजेरिच्या पहिल्या फेरीत चार गुण मिळवले. तसेच दुसऱ्या फेरतीही दोन गुण मिळवले. तर अंशूने दुसऱ्या फेरीत चार गुण मिळवून बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र यात ती अयशस्वी झाली. परिणामी तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.