ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सलग तिसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजपटूंनी पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या गगन नारंगने आज ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. याव्यतिरीक्त महाराष्ट्राच्या स्वप्नील सुरेश कुसळे या नेमबाजपटूनेही या प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियाच्या डेन सँपसनला सुवर्णपदक मिळालं.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीयांचा डंका, महाराष्ट्राच्या पुजा घाटकरला सुवर्णपदक

महिलांच्या २५ मी. पिस्तुल अंतिम फेरीत, भारताच्या स्नुराज सिंहला कांस्यपदक मिळालं. तर सुवर्ण आणि रौप्यपदक ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपल्या नावावर केलं. बुधवारी भारताने या स्पर्धेत ५ पदकांची कमाई केली. पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल आणि महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात पदकांची कमाई करत भारतीय नेमबाजपटूंनी स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला होता.

Story img Loader