भारतीय नेमबाजपटूंनी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या शाहजार रिझवी, ओंकार सिंह आणि जितू राय यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली. तर महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात पुण्याच्या पुजा घाटकरने सुवर्णपदकाची कमाई केली. तर भारताच्याच अंजुम मुदगलने रौप्यपदक मिळवलं. सिंगापूरच्या मार्टीना वेलेसुने कांस्यपदक मिळवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी अतिशय चांगला ठरला. भारतीय नेमबाजपटूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकासह ५ पदकांची कमाई केली. याआधी भारताच्या हिना सिद्धूने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं. हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा – १० मी एअर पिस्तुल प्रकारात हिना सिद्धुला सुवर्णपदक