ऑस्ट्रेलियन संघाने २० सप्टेंबरपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी मोहालीमध्ये सराव सुरू केला आहे. भारताला ही मालिका मायदेशात खेळायची असल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी आव्हान नक्कीच सोपे नसेल. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघातील मागील आकडेवारी पाहता भारताच पारड जरा मजबूत आहे. या मालिकेतील प्रदर्शनानंतर संघ व्यवस्थापनाला त्यांच्यातील कमी समजू शकेल.

टी२० क्रिकेटमध्ये या दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास असे लक्षात येते की, मागचे तीन सामने वगळता भारत हा नेहमीच वरचढ राहिलेला दिसतो. याचे कारण, मागच्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला त्यांच्याच मायदेशात पराभवाची धुळ चारली आहे, जी भारतीय संघासाठी चिंतेची बाब असेल. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण २३ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी १३ सामन्यांमध्ये भारत, तर ९ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ जिंकला होता. राहिलेल्या एका सामन्याचा निकाल लागू शकला नव्हता. या सामन्यांपैकी ७ सामने भारतात खेळले गेले. मायदेशात भारतीय संघाने ४ विजय मिळवले, तर तीन सामन्यांमध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियाने त्यांना मात दिली.

हेही वाचा   :   T20 World Cup मध्ये सलामीवीर कोण? रोहित शर्मा स्पष्ट म्हणाला, विराट चांगला खेळला म्हणून काय..

भारतात ऑस्ट्रेलियाचे सलग तीन विजय

मागच्या काही दौऱ्यांवर ऑस्ट्रेलियाने भारतला सलग तीन पराभव करत धूळ चारली होती. ही भारतीय संघासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. तीन विजयांपैकी पहिली विजय २०१७ मध्ये मिळवला होता. ऑस्ट्रेलिया संघ तेव्हा भारत दौऱ्यावर आणि टी२० मालिकेतील दुसरा सामना भारताने ८ विकेट्सने गमावली. त्यानंतर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यात पुन्हा एक टी२० मालिका खेळली. दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना ३ विकेट्सने, तर दुसरा सामना ७ विकेट्सने ऑस्ट्रेलियाने नावावर केला. असे असले तरी, यावेळी मात्र रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या तीन पराभवांचा वचपा नक्की भरून काढेल.

भारत संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ

अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), एश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक) , कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅडम झम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, सिन ऍबॉट.

Story img Loader