सलामीवीर निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉट यांच्या शतकांच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी  सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर २ बाद २६७ अशी मजल मारली आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकला (१७) झटपट गुंडाळत चांगली सुरुवात केली, पण त्यानंतर कॉम्प्टन आणि ट्रॉट यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. कॉम्प्टनने बाद होण्यापूर्वी १५ चौकारांच्या जोरावर १०० धावांची खेळी साकारली, तर ट्रॉटने १५ चौकारांच्या जोरावर नाबाद १२१ धावांची खेळी साकारली. खेळ संपला तेव्हा ट्रॉट नाबाद १२१ आणि केविन पीटरसन नाबाद १८ वर खेळत होते.

Story img Loader