आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चीन आणि जपानवर मात केल्यानंतर भारतीय संघ आता ओमानचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र दुखापतींनी भारतीय संघाला ग्रासले आहे. धर्मवीर सिंग पायाच्या घोटय़ाच्या तर एस. व्ही. सुनील खांद्याच्या दुखापतींनी त्रस्त असल्याने भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांच्या चिंता वाढल्या आहेत. धर्मवीर आणि सुनील यांच्या अनुपस्थितीमुळे नॉब्स यांना संघाच्या रणनीती बदल करावा लागणार आहे. दरम्यान भारत, पाकिस्तान आणि मलेशिया या तिन्ही संघांनी दोन सामने जिंकले असून त्यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत.
आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा : भारताला दुखापतींचे ग्रहण
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत चीन आणि जपानवर मात केल्यानंतर भारतीय संघ आता ओमानचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र दुखापतींनी भारतीय संघाला ग्रासले आहे.
First published on: 23-12-2012 at 01:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confident india hit by injuries ahead of oman match