भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रभारी अध्यक्षपद स्वीकारल्यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर लगेचच कामाला लागले आहे. आयपीएलचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल यांच्याशी गावस्कर यांनी चर्चा केली असून स्पर्धेबाबतही माहिती त्यांनी जाणून घेतली आहे.
‘‘आयपीएलचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल आणि आयपीएलच्या व्यवस्थापनाबरोबर मी दुबईमध्ये चर्चा केली आणि यंदाच्या स्पर्धेबाबत माहिती जाणून घेतली,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये झालेल्या ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाची काळी छाया यंदाच्या स्पर्धेवरही आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, यंदाची स्पर्धा १६ एप्रिलला सुरू होणार आहे. मी माझ्या पद्धतीने सर्वतोपरी मेहनत घेऊन हे पर्व यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2014 रोजी प्रकाशित
गावस्कर लागले कामाला
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रभारी अध्यक्षपद स्वीकारल्यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर लगेचच कामाला लागले आहे.

First published on: 30-03-2014 at 08:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confident that ipl 2014 will be a success sunil gavaskar