आपल्या देशामध्ये क्रिकेट या खेळाचे सर्वात जास्त चाहते आहेत. काहीजण तर क्रिकेटला धर्माचा दर्जा देतात. देशाच्या कानाकोपऱ्या क्रिकेट खेळले जाते. अशा ठिकाणांमधूनच आपल्याला आतापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू लाभले आहेत. आता राजस्थानमधील अशाच एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देखील हा व्हिडीओ बघून खूप प्रभावित झाले आहेत. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना त्या मुलाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये दिसणारा मुलगा राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील गुडागावातील आहे. भरतसिंग खरवड असे त्याचे नाव आहे. व्हिडीओमध्ये भरत मैदानात मासेमारीचे जाळे लावून गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भरत हा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या संघर्षाने खूप प्रभावित झाला आहे. त्यानंतर त्याने मैदानात खेळपट्टी तयार केली आणि मासेमारीचे जाळे लावून गोलंदाजीचा सराव सुरू केला. गेल्या दीड वर्षांपासून तो दररोज तीन तास सराव करत आहे.

वयाच्या १६व्या वर्षी त्याच्या गोलंदाजीमध्ये कमालीची अचूकता दिसत आहे. भरतचा व्हिडीओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून रिट्वीट केला आहे. ”आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अविश्वसनीय प्रतिभा दडलेली आहे. ती ओळखून तिला पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना मी या मुलाची मदत करण्यासाठी आवाहन करतो”, अशा कॅप्शनसह राहुल गांधींनी व्हिडीओ रिट्वीट केला आहे.

हेही वाचा – ‘हा कोणाचा मुलगा आहे?’ पत्नी हेझलच्या पोस्टवरील युवराज सिंगची कमेंट व्हायरल

भरतच्या या व्हिडीओवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या मुलाची तुलना भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशी केली आहे. काहीजण त्याला जिमी अँडरसन म्हणत आहेत तर काहीजण पॅट कमिन्ससोबत त्याची तुलना करत आहेत. एका यूजरने त्याला क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळवून देण्याचीही तयारी दर्शवली आहे आहे.