भारत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय संघाने २०११मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. घरच्या मैदानांवर झालेला विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला होता. भारतीय संघाने २०१३मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली होती. मात्र, यानंतर ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. यंदा हा दशकभरापासूनचा दुष्काळ संपवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असल्याने यजमानांनाच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.
हेही वाचा >>> पाकिस्तानी संघाची भारतात चंगळ! पण शादाब खानने व्यक्त केली चिंता, म्हणाला, “आमचे फॅट्स वाढून..”
बलस्थाने
* एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा भारतीय संघात समावेश आहे.
* सलामीवीर शुभमन गिल सध्या सर्वात लयीत असलेला भारतीय फलंदाज आहे. मधल्या फळीतील केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना योग्य वेळी सूर गवसला आहे.
* अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजाही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत.
* मायदेशातील खेळपट्टय़ांवर जडेजा, अश्विन आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंमध्ये सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे.
* बुमरा, सिराज आणि शमी या दर्जेदार वेगवान गोलंदाजांमुळे भारताचा संघ परिपूर्ण दिसतो.
कच्चे दुवे
केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमरा यांनी अलीकडच्या काळातच भारतीय संघात पुनरागमन केले. हे तिघे दुखापतींमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होते. ते दीड महिना चालणाऱ्या विश्वचषकात आपली तंदुरुस्ती राखू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच भारताने आपल्या सर्वोत्तम १५ खेळाडूंची निवड केल्याचे दिसत असले, तरी अंतिम ११ खेळाडूंची निवडही योग्य असणे गरजेचे आहे. पाचवा गोलंदाज म्हणून ऑफ-स्पिनर अश्विन आणि मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर यापैकी कोणाला पसंती द्यायची, हा निर्णयही भारतासाठी निर्णायक ठरू शकेल.
जेतेपद : १९८३, २०११
गेल्या स्पर्धेतील कामगिरी : उपांत्य फेरी
संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
इंग्लंड
गतविजेत्या इंग्लंडला यंदाच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०१९मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने अप्रतिम कामगिरी केली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना आजही प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या स्मरणात आहे. यंदा भारतात, पूर्णपणे वेगळय़ा परिस्थितीत आणि वातावरणात इंग्लंडला खेळावे लागणार आहे. मात्र, या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील असे खेळाडू इंग्लंडकडे आहेत. त्यामुळे अन्य संघांना त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे जाणार नाही.
बलस्थाने
* बेन स्टोक्स, कर्णधार जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यावर इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त आहे.
* गेल्या विश्वचषकात स्टोक्सने इंग्लंडसाठी निर्णायक कामगिरी केली होती. त्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.
* मात्र, विश्वचषकापूर्वी त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत मोठे शतक झळकावले.
* तो विश्वचषकात केवळ फलंदाज म्हणून खेळणार असून त्याचा सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न असेल.
* मोईन अली आणि आदिल रशीद हे अनुभवी फिरकीपटूही इंग्लंडसाठी महत्त्वाचे ठरतील.
कच्चे दुवे
इंग्लंडने अलीकडच्या काळात फारसे एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. इंग्लंडने या वर्षांत मिळून केवळ १० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रमुख खेळाडूंना एकत्रित सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. तसेच भारताविरुद्धचा सराव सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे इंग्लंडला सर्वोत्तम सांघिक कामगिरी करण्यासाठी काही सामने लागू शकतील. तसेच मार्क वूड वगळता इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना यापूर्वी भारतात फारसे यश मिळालेले नाही.
गेल्या स्पर्धेतील कामगिरी : जेतेपद
जेतेपद २०१९ संघ : जोस बटलर (कर्णधार/यष्टिरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जो रूट, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, आदिल रशीद, सॅम करन, रीस टॉपली, डेव्हिड विली, मार्क वूड, ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन.