ENG vs AUS, Ashes series 2023: अ‍ॅशेसची दुसरी कसोटी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. एकीकडे जॉनी बेअरस्टोचे रन आऊट वादात सापडले आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजासोबत एमसीसी सदस्यांचे गैरवर्तनही चर्चेत होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी ४३ धावांनी जिंकून पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. आता सामन्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बेअरस्टो ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सशी रागाने हस्तांदोलन करताना दिसत आहे. या घटनेने आयपीएल २०२३ मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाच्या आठवणी ताज्या झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली आणि गौतम गंभीर चुकले

बेअरस्टोला चेंडू डेड झाल्याचे जाणवले आणि तो क्रीज सोडून पुढे आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीने खेळात जागरूकता दाखवत चेंडू स्टंपवर मारला. यानंतर थर्ड अंपायरने बेअरस्टोला धावबाद घोषित केले. येथूनच इंग्लंडसाठी सामना उलटला आणि संघाचा पराभव झाला. बेअरस्टोने अद्याप या घटनेवर भाष्य केले नसले तरी, मॅचनंतरच्या हँडशेकच्या वेळी त्याने कमिन्सकडे पाहिले. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात जेव्हा भांडण झाले होते तेव्हा आयपीएल २०२३ मध्येही अशीच घटना घडली होती. त्यानंतर एलएसजीचा मार्गदर्शक गंभीरने रागाच्या भरात कोहलीशी हस्तांदोलन केले.

कमिन्सला पत्रकारांनी विचित्र प्रश्न विचारले

सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला, “मला वाटते की कॅरीने काही चेंडूंपूर्वी बेअरस्टोला पुढे जाताना पाहिले होते. त्यावेळी त्याच्या लक्षात आले आणि त्याने त्या सामन्यात वारंवार चेंडू थेट स्टंपवर फेकले. मला वाटले की त्याने हे पूर्णपणे नियमात बसेल असे न्यायाला अनुसरून केले आहे. काहीजण असहमत असू शकतात, परंतु स्टार्कच्या झेलप्रमाणे, नियम हे खेळाचे नियमन करतात आणि मी त्याचे उल्लंघन करू शकत नाही. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कमिन्सला पत्रकारांच्या काही विचित्र प्रश्नांचाही सामना करावा लागला.

एका पत्रकाराने विचारले, “बेअरस्टोच्या बाद झाल्यानंतर कोणताही वाद नाही असे तुम्हाला वाटते, जे नियमांत होते, परंतु या मालिकेत नंतर आम्हाला मांकडिंग किंवा अंडरआर्म गोलंदाजी पाहायला मिळू शकते ?” यावर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने उत्तर दिले, “विकेट किती सपाट आहे यावर ते अवलंबून आहे. हा पर्याय असू शकतो. या उत्तरावर तिथे बसलेले लोक खूप हसले.”

हेही वाचा: Women’s Team Coach: ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक! १४ हजारांहून अधिक धावा करणारा घेणार रमेश पोवारची जागा

दुसऱ्या सामन्यात काय झाले?

अ‍ॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने ४३ धावांनी जिंकली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डाव ३२७ धावांवर आटोपला. बेन डकेटने ८३ आणि कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावा केल्या. पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने अवलंबलेल्या ‘बेसबॉल’ तंत्रावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial dismissal of bairstow and angry handshake with pat cummins recalls kohli gambhir watch the video avw
Show comments