India vs New Zealand, ICC World Cup 2023: आज क्रिकेट विश्वचषक २०२३चा पहिला उपांत्य फेरीतील सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दुपारी २ वाजता सामना सुरू होईल. सामन्यापूर्वी खेळपट्टीबाबत वाद निर्माण झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना खेळपट्टी क्रमांक ७ वर खेळवला जाणार होता, ती खेळपट्टी क्रमांक ६ मध्ये बदलण्यात आली, असा आरोप आहे. शेवटचा क्षणी हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप बीसीसीआयवर करण्यात आला आहे. या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंना अधिक मदत मिळेल, असे म्हटले जात आहे.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, “भारतीय बोर्डाने आयसीसीच्या परवानगीशिवाय भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनलसाठी खेळपट्टी बदलल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जर भारत आज जिंकला आणि अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम फेरीतही तेच होऊ शकते. आयसीसी इव्हेंटमधील खेळपट्ट्या प्रशासकीय मंडळाचे सल्लागार अँडी अ‍ॅटकिन्सन यांच्या देखरेखीखाली तयार केल्या जातात. ते प्रत्येक सामन्यासाठी मैदानावर जातात आणि कोणत्या खेळपट्टीवर सामना खेळला जाईल याविषयी स्थानिक देशाच्या बोर्डाशी आधीच सल्लामसलत करून सहमती दर्शवतात.”

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

वृत्तानुसार त्यात पुढे म्हटले आहे की, “आयसीसीच्या या कराराकडे दुर्लक्ष करण्यात आले असून वानखेडे येथील उपांत्य फेरीचा सामना अशा खेळपट्टीवर होईल जिथे या स्पर्धेतील दोन सामने आधीच खेळले गेले आहेत. यामुळे त्या खेळपट्टीवर भारताच्या फिरकीपटूंना अधिक मदत मिळेल,” असा दावा केला जात आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, “मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील आजच्या सामन्याची खेळपट्टी ७व्या क्रमांकाची असायला हवी होती, ती संपूर्णपणे ताजी खेळपट्टी आहे. या ठिकाणी असलेल्या चार गट सामन्यांपैकी कोणत्याही सामन्यासाठी न वापरलेली ती खेळपट्टी आहे, म्हणजेच या विश्वचषकात येथे एकही सामना खेळला गेला नाही.”

भारत न्यूझीलंड विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना खेळपट्टी क्रमांक ७ वरून खेळपट्टी क्रमांक ६ वर हलवण्यात आल्याचा बातमी डेली मेलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. जिथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त भारत आणि श्रीलंका यांच्यात याआधी सामने आयोजित करण्यात आले आहेत. अहवालात म्हटले आहे की, “अंतिम सामन्याच्या तयारीबद्दल थेट उत्तरे न मिळाल्याने अ‍ॅटकिन्सन निराश झाला होता आणि गेल्या शुक्रवारी त्याला अहमदाबादला पाठवण्यात आले आहे. असे झाले की इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील स्पर्धेचा पहिला सामना पूर्व ठरल्याप्रमाणे खेळपट्टी क्रमांक ६ वर होत असताना, पुढील तीन सामन्यांपैकी एकही सामना नियोजित खेळपट्टीवर झाला नाही. “खेळपट्टीचे बदल हे योग्य कारण किंवा पूर्व सूचनेशिवाय केले गेले,” अ‍ॅटकिन्सनने त्याच्या वरिष्ठांना पाठवलेल्या ईमेलमध्ये हा दावा केला.

अ‍ॅटकिन्सनने शिफारस केली आहे की, “फायनल सामना खेळपट्टी क्रमांक ५ वर खेळली जावा, जी फक्त एकदाच वापरली गेली आहे.” गेल्या आठवड्यात याबद्दल पुढे म्हटले की, “खेळपट्टी क्रमांक ६ ही या विश्वचषकात दोनदा वापरली गेली आहे. याबाबत अजून उत्तर आलेले नाही. त्यामुळे जर भारतीय संघ फायनलला पोहचला तर याच खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल, जेणेकरून फिरकीपटूंना अधिक मदत मिळेल.”

हेही वाचा: ICC Rankings: सेमीफायनलपूर्वी मोहम्मद सिराजला धक्का!आयसीसी क्रमवारीत झाले नुकसान, केशव महाराज अव्वल स्थानी

यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “या विविध बदलांना गुजरात क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिली आहे.” दुसरीकडे गुजरात क्रिकेट असोसिएशनम्हणते की, “आम्ही बीसीसीआयच्या निर्देशांनुसार काम करत आहोत. त्यात भारतीय संघ व्यवस्थापनाकडे थेट केलेल्या विनंतीचा समावेश आहे.”बीसीसीआयच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “आयसीसीचा स्वतंत्र खेळपट्टी सल्लागार असतो. तो विविध ठिकाणांबरोबर त्यांच्या प्रस्तावित खेळपट्टीच्या वाटपावर काम करतो. ही प्रक्रिया या त्या-त्या ठिकाणची परिस्थितीवर अवलंबून असते.”