Controversy between veterans about KL Rahul: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत, तरीही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. याबाबत क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक तज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला संघातून बाहेर काढण्याची चर्चा करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यापैकी माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद सतत ट्विट करत त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. एकीकडे व्यंकटेश केएलवर टीका करत असून दुसरीकडे आकाश चोप्रा त्याला पाठिंबा देत आहे. या दोन दिग्गजांमधील ट्विटर युद्धात दररोज नवनवीन ट्विस्ट आणि वळण येत आहेत. ज्यामध्ये आकाश चोप्राने व्यंकटेश प्रसादला एक ऑफर दिली होती, जी व्यंकटेश प्रसादला धुडकाऊन लावली.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतील खराब कामगिरीनंतरही राहुलची निवड झाली. त्यानंतर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद म्हणाले होते की, केएल राहुलची निवड कामगिरीच्या आधारावर नाही तर पक्षपाताच्या आधारावर करण्यात आली. त्यानंतर केएल राहुलबद्दलचे त्याचे ट्विट व्हायरल झाले होते. दुसरी कसोटी संपल्यानंतर त्याने अजिंक्य रहाणे, शिखर धवन, मयंक अग्रवाल यांची आकडेवारी शेअर केली. तेव्हा आकाश चोप्रा राहुलच्या बचावासाठी पुढे आला. त्यानंतर चोप्राने प्रसादला शांत राहण्याची आणि ‘अजेंडा’ न चालवण्याची विनंती एका व्हिडिओच्या शेवटी केली.

हेही वाचा – WPL Title Sponsor: IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत झाला तब्बल पाच वर्षाचा करार

आकाश चोप्राची व्यंकटेशला सोबत व्हिडिओ बनवण्याची ऑफर –

आकाश चोप्राचा हा व्हिडिओ समोर येताच व्यंकटेश प्रसाद भडकला. त्यांने आकाश चोप्राचे एक जुने ट्विट शेअर केले, ज्यामध्ये तो रोहित शर्माला संघातून काढून टाकण्याविषयी बोलत आहे. त्याचवेळी व्यंकटेशचे हे ट्विट आकाशला फारसे पटले नाही आणि त्याने व्यंकटेशला त्याच्यासोबत यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याची ऑफर दिली.

आकाशने ट्विट केले की, “वैंकी भाऊ, संदेश भाषांतरात हरवला आहे. मी यूट्यूब चॅनलवर आहे. मी तुम्हाला व्हिडिओ चॅटसाठी आमंत्रित करतो…आपण लाइव्ह जाऊ शकतो. मतभिन्नता ही चांगली गोष्ट आहे… चला ते चांगल्या प्रकारे करूया. यावर कोणी प्रायोजक असणार नाही आणि त्यातून कोणीही पैसे कमावणार नाही. तयार आहे का? तुमच्याकडे माझे आकडे आहेत.”

हेही वाचा – Dinesh Karthik: ‘…म्हणून टॉयलेटमध्ये गेल्यावर रडू लागलो’; केएल राहुलच्या खराब फॉर्मवर दिनेश कार्तिकचे मोठं वक्तव्य

व्यंकटेश प्रसादने आकाश चोप्राची ऑफर नाकारली –

व्यंकटेश प्रसादने आकाश चोप्राची व्हिडिओ बनवण्याची ऑफर स्पष्टपणे नाकारली. तसेच आकाश चोप्रावर त्याचे चुकीचे वर्णन केल्याचा आरोप केला. त्याचवेळी प्रसादने आकाशला पुढे न जाण्याबाबतही सांगितले. व्यंकटेश प्रसादने ट्विट केले की, “नाही आकाश, भाषांतरात काहीही गमावले नाही. तुमच्या १२ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझे वर्णन अजेंडा चालक म्हणून केले आहे. कारण ते तुमच्या मतानुसार नाही. हे अगदी स्पष्ट आहे. आणि या ट्विटर थ्रेडमध्ये मी माझा मुद्दा अगदी स्पष्टपणे मांडला आहे. यापुढे तुमच्याशी जोडला जाऊ इच्छित नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy between veterans about kl rahul venkatesh prasad rejected this special offer of akash chopra vbm