गेल्या आठवडय़ापासून संयुक्त अरब अमिरातीतील तापमानामध्ये कमालीची घट झाल्याने ‘आयपीएल’मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना संघांसाठी सोयीचे ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.

‘‘स्पर्धेच्या पूर्वाधात प्रथम फलंदाजी करणारे संघ अधिक सामने जिंकत होते. परंतु मागील ८-१० दिवसांपासून अमिरातीतील तापमानात घट झाली असून दवाचा घटकही मोलाची भूमिका बजावू लागला आहे. त्यामुळे सलग पाच-सहा सामन्यांत धावांचा पाठलाग करणारा संघच जिंकत आहे,’’ असे सचिन म्हणाला. बुधवार, २८ ऑक्टोबरपासून झालेल्या नऊपैकी आठ सामन्यांत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

Story img Loader