Cooch Behar Trophy, Prakhar Chaturvedi: कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने बीसीसीआयच्या देशांतर्गत कूचबिहार ट्रॉफी स्पर्धेत इतिहास रचला. या अंडर-१९ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने मुंबईविरुद्ध ४०४ धावांची नाबाद खेळी खेळली. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. प्रखरची फलंदाजी पाहून सर्वांना लारा आठवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रखरने कर्नाटकसाठी डावाची सुरुवात केली आणि डाव घोषित होईपर्यंत तो नाबाद राहिला. त्याने ६३८ चेंडूंचा सामना करत ४६ चौकार आणि तीन षटकार ठोकले. कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एका डावात ४०० धावा करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिला डाव ८९० धावांवर घोषित केला. त्याच्या फलंदाजांनी २२३ षटकांचा सामना केला आणि संघाने आठ विकेट्स गमावल्या. प्रखरने ४०० धावा पूर्ण करताच संघाने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटककडून हर्षिल धर्मानीनेही शतक झळकावले

विशेष म्हणजे याच सामन्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड यानेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४६ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. हर्षिल धर्मानी हा डावातील दुसरा शतकवीर ठरला. त्याने २२८ चेंडूत १९ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १६९ धावा केल्या. प्रखरने त्याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी २९० धावांची भागीदारी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाव घोषित होण्यापूर्वी त्याने समर्थ एन. बरोबर नवव्या विकेटसाठी नाबाद १६३ धावांची भागीदारी केली.

हेही वाचा: Ishan Kishan: “तू देशासाठी खेळत आहेस…”, माजी पाकिस्तानी खेळाडूने मानसिकदृष्ट्या थकलेला इशान किशनला मारला टोमणा

समित द्रविडने दोन गडी बाद केले

या सामन्याबद्दल जर सांगायचे तर, स्पर्धेचा अंतिम सामना के.एस.सीए नेव्हुले स्टेडियमवर खेळला गेला. कर्नाटकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चुकीचा सिद्ध होईल असे एकावेळी वाटत होते. मुंबईने पहिल्या डावात ३८० धावा केल्या होत्या. मुंबईकडून आयुष म्हात्रेने १४५ धावांची खेळी केली. कर्नाटककडून गोलंदाजी करताना प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडनेही दोन गडी बाद केले होते.

हेही वाचा: Prakhar Chaturvedi: कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने रचला मोठा इतिहास! कूचबिहार ट्रॉफीमध्ये ठोकल्या ४०० धावा

कर्नाटक चॅम्पियन झाला

कर्नाटकने जेव्हा फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा प्रखरसमोर इतर सर्व खेळाडूंची कामगिरी फिकी पडली. त्याने ४०४ धावा करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने पहिल्या डावात ५१० धावांची मोठी आघाडी घेतली. चौथ्या दिवशी कर्नाटकने डाव घोषित केल्यावर दोन्ही संघांनी बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात आघाडी घेतल्याने कर्नाटक यंदाच्या मोसमात कूचबिहार ट्रॉफीचा चॅम्पियन ठरला आहे. दरम्यान, प्रखरने कार्तिकसह १०९, हर्षिलसह २९०, कार्तिकेयसह १५२, समित द्रविडसह ४१, ध्रुवसह ११, धीरजसह १३, हार्दिकसह ८६, युवराजसह १५ आणि समर्थसह १७३ धावांची भागीदारी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooch behar trophy karnatakas prakhar chaturvedi scored a mountain of runs scored 400 runs in one match avw