इंगलवूड (कॅलिफोर्निया) : व्हेनेझुएलाने आपली विजयी लय कायम राखताना मेक्सिकोला १-० अशा फरकाने नमवत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सामन्यातील एकमेव गोल ५७व्या मिनिटाला कर्णधार सालोमोन रोन्डोन याने पेनल्टीच्या माध्यमातून केला.

व्हेनेझुएलाने आपल्या पहिल्या सामन्यात इक्वेडोरला २-१ अशा फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे ‘ब’ गटात ते किमान दुसऱ्या स्थानी राहणार हे निश्चित झाले आहे. ते आपला अखेरचा सामना रविवारी जमैकाविरुद्ध खेळणार आहेत. जमैकाचा संघ यापूर्वीच बाद फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मेक्सिकोने जमैकाला १-० असे पराभूत करत सुरुवात केली होती. त्यांचे इक्वेडोर इतकेच तीन गुण आहेत. मेक्सिकोला आपला अखेरचा सामना रविवारी इक्वेडोरशी खेळायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवेल.

Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प घेणार ऐतिहासिक निर्णय! जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा बदलणार
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

हेही वाचा >>>IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य, म्हणाला – “१५ वर्ष खेळलेल्या…”

त्यापूर्वी, गुरुवारी झालेल्या सामन्याच्या मध्यंतरापर्यंत मेक्सिकोने व्हेनेझुएलाला रोखून धरले होते. मात्र, दुसऱ्या सत्रात त्यांनी गोल करत मेक्सिकोच्या अडचणी वाढवल्या. यानंतर व्हेनेझुएलाने भक्कम बचाव करताना अखेरपर्यंत मेक्सिकोला गोल करण्याची संधी दिली नाही.

इक्वेडोरची जमैकावर मात

अन्य सामन्यात इक्वेडोरने जमैकावर ३-१ अशा फरकाने विजय नोंदवला. इक्वेडोरचा २०१६ नंतर कोपा अमेरिका स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी, पहिल्या सामन्यात त्यांना व्हेनेझुएलाकडून पराभूत व्हावे लागले होते. जमैकाच्या केसी पाल्मरकडून झालेल्या स्वयंगोलमुळे इक्वेडोरला आघाडी मिळाली. यानंतर पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत केंड्री पाएझने गोल करत इक्वेडोरला २-० असे आघाडीवर नेले. उत्तरार्धात जमैकाच्या मिखाइल अँटोनिओने गोल करत आघाडी कमी केली. मात्र, भरपाई वेळेत अॅलन मिंडाने गोल केल्याने इक्वेडोरने सामना ३-१ असा जिंकला.

Story img Loader