न्यूझीलंड भूमीवर अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकून जलद शतक करण्याचा विक्रम रचणाऱया कोरे अँडरसनवर यावेळीच्या आयपीएल २०१४च्या लिलावात सर्वांची नजर असण्याची दाट शक्यता आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या ‘त्या’ एकदिवसीय सामन्यात कोरे अँडरसनची तुफान खेळी पाहून आयपीएल संघ मालकांचे डोळे कोरे अँडरसनवर केंद्रीत झालेही असतील. त्याबद्दल खुद्द वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघातून खेळाणारा ड्वेन ब्रावोने योग्य माणसांची कोरे अँडरसनच्या खेळीवर नक्कीच नजर पडली असेल असे म्हटले.
नवे ‘कोरे’ वर्ष.. वेगवान शतकाचा परीसस्पर्श
यातून आगामी आयपीएल स्पर्धेत कोरे अँडरसन चेन्नई सुपरकिंग्जमध्ये असावा अशी अप्रत्यक्ष इच्छा डवेन ब्रावोने व्यक्त केली. संघात सर्वोत्तम खेळाडून याआधीपासूनच असताना त्यात आणखी एका उत्कृष्ट खेळाडूचा समावेश होणे संघाच्या दृष्टीने आनंदाचेच असते. त्यामुळे कोरे अँडरसन सोबत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर नक्कीच .याची संघाला मदत होईल असेही ड्वेन म्हणाला.
भारताला हुडहुडी!
त्यात भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अँडरसनने ४० चेंडूत ६८ धावा रचून कर्णधार महेंद्रसिंह धोनीचेही लक्ष आयपीएलसाठी वेधून घेतले आहे. तसेच आयपीएलमधील इतर संघ मालकांचेही कोरे अँडरसनला संघात समाविष्ट करून घेण्याकडे लक्ष असेल. त्यामुळे कोरे अँडरसन लिलावात चर्चेचा मुद्दा असणार आहे.  

Story img Loader