न्यूझीलंडचा फलंदाज ग्रँट एलियटला दुखापतीमुळे खेळता येणार नसून त्याच्या जागी कोरेय अ‍ॅण्डरसनला संघात स्थान देण्याची विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्य केली आहे. एलियटच्या डाव्या पायाच्या पोटऱ्यांना सरावादरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत गंभार स्वरूपाची असल्याने त्याला आगामी स्पर्धेत खेळता येणार नव्हते. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीकडे त्याच्या जागी संघात अ‍ॅण्डरसनला स्थान देण्याची विचारणा केली होती.
‘‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या तांत्रिक समितीने दुखापतग्रस्त ग्रँट एलियटच्या जागी कोरेय अ‍ॅण्डरसनला संघात स्थान देण्याची न्यूझीलंडच्या संघाची विनंती मान्य केली आहे,’’ असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader