इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान पंत त्यापाठोपाठ आणखी एका सदस्याला करोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर असल्याचे समोर आले आहे. संबधित सदस्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून तो संघासोबत डरहॅमला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आणखी ३ कोचिंग असिस्टंटनाही करोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ऋषभ पंतसह भारतीय संघातील आणखी चार सदस्य डरहॅमला जाऊ शकणार नाही. यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंचा समावेश आहे. या चौघांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. इंग्लंड क्रिकेट संघावर करोनाचं सावट असतानाच भारतीय संघातील सदस्यांनाही करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

ऋषभ पंतला डेल्टा व्हेरियंटची लागण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता पॉझिटिव्ह आली. ऋषभ पंत मागील ८ दिवसांपासून विलगीकरणात आहे. दरम्यान पंतच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये आढळणारा डेल्टा व्हेरियंट पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर पडत वेळ घालवण्याची परवानगी देण्यात आली होती. २३ जूनला चॅम्पियनशिपची फायनल झाली. बीसीसीआयनेही परवानगी देताना खेळाडू आणि इतर कर्मचारी जुलैच्या मध्यात पुन्हा बायो बबलमध्ये परततली असं स्पष्ट केलं होतं. भारतीय संघ इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona inclusion in the indian team after rishabh pant another got infected with coronavirus abn