CoronaVirus Outbreak : करोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात सुमारे दीड लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. पण स्पेनच्या २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकावर मात्र काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

CoronaVirus : T20 World Cup बद्दल यजमान ऑस्ट्रेलियाकडून महत्त्वाची अपडेट

करोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत तो २०१६ पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. त्याच्या शरिरात करोना व्हायरसची लक्षणे आढळली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात येत होते. परंतु करोनाशी त्याची झुंज अपयशी ठरली.

CoronaVirus : पाकिस्तानला करोनाचा फटका, केली महत्त्वाची घोषणा

करोना व्हायरसचा फैलाव झाल्यापासून स्पेनमध्ये आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गार्सिया हा करोनामुळे मृत पावलेला मलागा प्रांतातील पाचवा व्यक्ती ठरला आहे. पण, दुर्दैवाची बाब म्हणजे करोनामुळे मृत पावलेल्यांमध्ये गार्सिया हा सर्वात युवा होता. अन्य मृत व्यक्ती ७० ते ८० वर्षांचे होते. गार्सियाच्या मृत्यूपूर्वी करोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात कमी वयाची व्यक्ती ही लंडनमधील ५९ वर्षीय निक मॅथ्यूज होते.

CoronaVirus : “दुसऱ्या देशांकडून थोडं शिका’; ‘बर्थ डे गर्ल’ सायनाचा चाहत्यांना सल्ला

गार्सियाची करोना व्हायरसशी झगडण्यासाठी प्रतिकारशक्ती कमी पडली; अन्यथा गार्सिया वाचला असता, असे स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून याबाबत जनजागृती केली जात आहे.