भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाणारी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका करोना व्हायरसच्या धसक्याने रद्द करण्यात आली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर करोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन्ही सामने रद्द करण्यात आले. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता विमानतळावरून स्वदेशी प्रयाण करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Video : १२ चौकार, ८ षटकार… पाहा ख्रिस लीनचं तुफानी शतक

सामान्यत: भारतात येणारा परदेशी क्रिकेट संघ मायदेशी प्रयाण करताना मुंबई किंवा दिल्लीच्या विमानतळाची निवड करतात. मात्र करोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात बळावत असताना आफ्रिकेच्या संघाने थेट कोलकाताच्या विमानतळाची निवड केली आहे. भारतात विविध राज्यांत करोनाचे रूग्ण आढळले आहेत, पण सुदैवाने कोलकाता शहरात अद्याप या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत सर्वात सुरक्षित अशा कोलकाता विमानतळावरून आफ्रिकेचा संघ दुबईमार्गे मायदेशी प्रयाण करणार आहे.

सचिन, सेहवाग खेळत असलेल्या टी २० लीग स्पर्धेबाबत मोठा निर्णय

बंगाल क्रिकेट संघटनेचे (सीएबी) अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी एक वृत्तसंस्थेला सांगितले की दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी लखनऊहून कोलकाता येथे पोहोचेल आणि मग मंगळवारी संघ मायदेशी रवाना होईल. विमानतळाच्या नजीकच्या हॉटेलमध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून त्यांना अधिकचा प्रवास करावा लागणार नाही. या संबंधी BCCI ने बंगालच्या मुख्यमंत्रींशी चर्चा केली आहे.

पाहा – Video : गोलंदाजाने तोडला स्टंप… फलंदाजही झाला अवाक

भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघात क्विंटन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), टेंबा बावुमा, रासी वॅन डर डसन, फाफ डु प्लेसिस, कायल वेरिन, हेन्रीच क्लासें, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडिल फेलुक्वायो, लुंगी एनगीडी, लुथो सिपाम्ला, ब्युरॉन हेंडरिक्स, एनरिच नॉर्ये, जॉर्ज लिंड, केशव महाराज या खेळाडूंचा समावेश होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus india vs south africa odi series cancelled team from lucknow to south africa via kolkata dubai proteas route in times of covid 19 vjb
Show comments