करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनासाठी निधी उभारण्यासाठी भारत-पाक सामने भरवावेत, अशी मागणी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्यामुळे तो चांगलाच ट्रोल झाला होता. त्यात भर म्हणून आता आणखी एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारत-पाक क्रिकेट मालिकेचा आग्रह धरला आहे.
“रामायणातील ‘या’ योद्ध्याकडून मिळाली बॅटिंगची प्रेरणा”
“क्रिकेटबद्दल भारत आणि पाकिस्तान यांच्यात इतका तणाव का असतो माहिती नाही. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकमेकांना चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळले जायला हवेत. किमान त्या दृष्टीने आता प्रयत्न तरी करायला हवेत. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सर्वाधिक प्रेक्षकवर्गाची उपस्थिती होती. थेट प्रक्षेपणात देखील हा सामना सर्वाधिक पाहिला गेला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या साऱ्यांनाच भारत-पाकिस्तान सामने व्हायला हवेत. चाहत्यांनीच आता भारत-पाक सामने तटस्थ ठिकाणी खेळवायचा आग्रह धरायला हवा”, असे मत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी व्यक्त केले.
“रामायणातील ‘या’ योद्ध्याकडून मिळाली बॅटिंगची प्रेरणा”
दुर्दैवी अंत! क्रीडाविश्व टिपणाऱ्या फोटोग्राफरचे करोनामुळे निधन
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळले जावेत. त्या निधीचा करोनाविरोधात लढण्यासाठी वापर करावा, असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले होते. त्यावर “शोएबला त्याचं मत मांडण्याचा हक्क आहे, पण माझ्या मते आपल्याला पैशांसाठी भारत-पाक सामन्यांची गरज नाही. आपल्याकडे पुरेसा पैसा आहे”, असे कपिल देव यांनी म्हटले होते. कपिल देव यांच्या वक्तव्यावर “मला काय म्हणायचं आहे हे कपिल भाईंना समजलंच नाही. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आता सर्व मुद्दे बाजूला ठेवून पैसा कसा निर्माण होऊल याचा विचार करणं गरजेचं आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी हे सामने पाहण्यासाठी टिव्हीला चिकटून बसतील यात काहीच शंका नाही. कपिल भाईंनी म्हणलं की आम्हाला पैशाची गरज नाही, कदाचित त्यांना पैशांची गरज नसेल पण इतरांना ती नक्कीच आहे. माझ्या मते मी सुचवलेल्या पर्यायावर भविष्यात नक्कीच विचार होईल”, असे स्पष्टीकरण शोएबने दिले.