करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अनेक खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. अशात काही खेळाडू कुटुंबीयांसोबत रमले आहेत, तर काही व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. काही खेळाडू सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.
टेनिस कोर्टवरची हॉट सौंदर्यवती मारिया शारापोव्हाबद्दलच्या खास गोष्टी
लॉकडाउनमध्ये काही खेळाडू अगदी कंटाळलेले दिसून येत आहेत. तशातच ५ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने चक्क आपला फोन नंबर शेअर केला. मारिया शारापोव्हाने तिच्या ट्विटर हँडलवर तिचा फोन नंबर शेअर केला. तिने फोन नंबर शेअर करताना ‘मला तुमच्याशी बोलायला आवडेल. लॉकडाउनच्या काळातील अनुभव माझ्याशी शेअर करा. मी तुमच्यासोबत माझा नंबर शेअर करत आहे’, असे सांगितले आणि खरोखरोच आपला नंबर शेअर केला.
Not only did I just get a 310 number( hello cool cats)but I’m sharing it with you—Text me! 310-564-7981. For real. Tell me how you’re doing, ask me questions, or just say hello Any great recipes welcome too #community pic.twitter.com/JNCuGzJXRS
— Maria Sharapova (@MariaSharapova) April 3, 2020
दरम्यान, आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने २ वेळा फ्रेंच ओपन आणि प्रत्येकी एकदा ऑस्ट्रेलियन ओपन, अमेरिकन ओपन व विम्बल्डन स्पर्धांची विजेतेपदं पटकावली. पण वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी मारिया शारापोव्हा हिने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. शारापोव्हाच्या या निर्णयाची अनेकांना कल्पना नव्हती. त्यामुळे या निर्णयानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला. मारिया शारापोव्हाने तिच्या कारकिर्दीत विविध विक्रमांना गवसणी घातली. त्याशिवाय ती एक ग्लॅमरस आणि सौंदर्यवती टेनिसस्टार म्हणूनदेखील चर्चेत राहिली.
दोन वेळा लग्न करणारे लोकप्रिय क्रिकेटपटू…
मारिया शारापोव्हाचा जन्म २६ एप्रिल १९८७ साली सर्बिया येथे झाला. शारापोव्हाने रशियात चार वर्षांची असताना टेनिस खेळण्यास सुरूवात केली होती. ३ वर्षांनंतर १९९४ मध्ये तिचे कुटुंब अमेरिकेत आले. त्यामुळे अमेरिकेत शारापोव्हाने टेनिसचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले. २००२ साली मारिया शारापोव्हा हिने ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनिअर स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती सर्वात तरूण टेनिसपटू ठरली होती. शारापोव्हाने २००४ साली १७ वर्षांची असताना विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत आपले पहिले ग्रँडस्लॅम पटकावले. त्या सामन्यात तिने अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स हिला पराभूत केले होते.
“जा…चीनबरोबर क्रिकेट खेळा!”; भारताकडून व्हेंटिलेटर मागणाऱ्या अख्तरवर नेटिझन्स संतापले
२००४ याच वर्षी मारिया शारापोव्हा हिने Women’s Tennis Association च्या टॉप १० मध्ये प्रवेश केला. २००६ साली वयाच्या १९ व्या वर्षी मारिया शारापोव्हाने अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली. २००८ साली तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, तर २०१२ साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने तिने विजेतेपदाचा स्लॅम पूर्ण केला. असा पराक्रम करणारी ती १० वी महिला टेनिसपटू होती. २०१३ साली सलग ९ वर्षे सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत शारापोव्हाला अव्वल स्थान मिळाले होते. २०१६ साली शारापोव्हा उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी दोषी आढळली. त्यामुळे तिच्यावर २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण नंतर ही बंदी कमी करून १५ महिन्यांवर आणण्यात आली होती. २०१७ साली शारापोव्हाने बंदीची शिक्षा संपल्यावर टेनिसमध्ये पुनरागमन केले. पण त्यानंतर तिला कारकिर्दीत फारशी चमक दाखवता आली नाही.