#HappyBirthdaySachin : यंदा देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि खडतर काळात करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मास्टरब्लास्टर सचिनने घेतला आहे. सचिनच्या जवळच्या मित्राने याविषयी माहिती दिली. “ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी करोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत. अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं सचिनने ठरवलं आहे”, असे सचिनच्या मित्राने सांगितलं.

साराने खास फोटो पोस्ट करत दिल्या सचिनला शुभेच्छा

भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा आज वाढदिवस… २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याची प्रत्येक खेळी ही क्रिकेटप्रेमींच्या मनावर अजूनही अधिराज्य गाजवत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावणाऱ्या पहिल्या आणि एकमेव खेळाडूच्या नावावर अनेकविध विक्रम आहेत. त्याने २४ वर्षांच्या कारकिर्दीत दमदार कामगिरी केली असून सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

#HappyBirthdaySachin : खेळातला सचिन अन् मैदानाबाहेरचा सचिन

मुंबई पोलिसांनीदेखील सचिनला आज शुभेच्छा दिल्या असून महाराष्ट्र पोलिसांनी सचिनला ‘टन’भर शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी तेंडुलकरला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना राज्यातील नागरिकांनाही खास संदेश दिला आहे. करोना व्हायरस संकटाचा सामना करताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन न करता घरीच थांबा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. “सचिनच्या ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ ने अनेकदा भारताला जिंकवलंय! आता तुमची पाळी आहे. विनाकारण बाहेर फिरत असाल तर स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा. ही ‘टेस्ट’ भारतच जिंकणार! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ला वाढदिवसाच्या ‘टन’ भर शुभेच्छा! #Sachinbirthday”, असे ट्विट केलं आहे.

९० वेगवेगळ्या मैदानांवर खेळणारा एकमेव खेळाडू; जाणून घ्या सचिनचे काही खास फोटो

Sachin Fights Coronavirus! परळच्या ‘जबरा फॅन’कडून सचिनला अनोख्या शुभेच्छा

दरम्यान, सचिनने करोनाग्रस्तांसाठी भरभक्कम मदत केली आहे. मास्टर ब्लास्टरने आपला वाटा उचलत ५० लाखांची आर्थिक मदत केली आहे. शिवाय, सध्या तो एका संस्थेमार्फत सुमारे ५००० लोकांच्या जेवणाखाण्याची जबाबदारीदेखील उचलत आहे.

Story img Loader